सभापतीच बसले उपोषणाला

 सभापतीच बसले उपोषणाला 

वेब टीम नगर : शहरातील पथदिव्यांचा प्रश्‍न तात्काळ सुटावा यासाठी,सभापती मनोज कोतकर यांनी आज (मंगळवारी) महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर उपोषणास बसले. स्थायी समितीच्या सभापतींना उपोषणाला नामुष्की ओढावल्याने हा विषय चर्चेचा बनला मनपा प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.उपोषणास सभापती कोतकर यांच्यासह दत्ता जाधव , संजय ढोणे , मनोज दुल्लम , निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रशांत गायकवाड, आदी यावेळी उपोषणास बसले. यावेळी आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात सर्व नगरसेवकांनी प्रभागामध्ये विजेचा हक्क निर्माण झाल्याने नगरसेवक स्वेच्छा निधीतून अंदाजे १ लाखा पर्यंतच्या साहित्याची मागणी केली. मनपा फंडातून साहित्य मिळण्यास उशीर असल्याने इतर कामे करून विद्युत साहित्याबाबत आग्रही भूमिका घेतली. या करिता ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय मंजूर करण्यात आला होता. 

सभे मध्ये झालेल्या चर्चेनुसार साहित्य तात्काळ मिळेल असे आश्वासन प्रशासनाने दिलें होते. मात्र आजपर्यंत साहित्य न मिळाल्याने हे उपोषण करण्यात आले.     Post a Comment

0 Comments