आरोग्य आहार : तवा पनीर

 आरोग्य आहार 

तवा पनीर 

साहित्य : अर्धा किलो पनीरचे बारीक चौकोनी तुकडे , १ चमचा ओवा , १ गड्डी लसूण व २ इंच आलं एकत्र वाटून, २ मोठे कांदे , ५-६ लवंगा, ३-४ वेलदोडे , २ दालचिनीचे तुकडे , ५ मोठे टोमॅटो , ४ मिरच्या , चवीनुसार मीठ , किंचित साखर , किंवा डब्यातील अननसाची एक चकती , पाव वाटी लोणी , चिमूटभर खाण्याचा ऑरेंज कलर. 

कृती : कांदा , टोमॅटो बारीक चिरून त्यात निम्मे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून शिजवून वाटून पुरणयंत्रातून  कडून दाटसर सॉस करून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ व किंचित साखर घालावी व कणभर ऑरेंज कलर घालावा. 

सर्व्ह कारण्याआधी कढईत किंवा खोलगट तव्यावर बटर गरम करून त्यात १ टीस्पून ओवा व आलं लसूण मिरची पेस्ट पसरतून त्यात तयार सॉस घालावा व उकळी आल्यानंतर पनीरचे तुकडे घालून अलगद हाताने हलवावे व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. 

टीप :

* या पदार्थाची ग्रेव्ही दाटसर ठेवावी व शकतो गरमागरम सर्व्ह करावी.     

* एकदा गार झालेली परत गरम केल्यास चव बदलते . 

Post a Comment

0 Comments