आधी हत्येची सुपारी ,विनयभंग तर आता खण्डणीचा गुन्हा दाखल

आधी हत्येची सुपारी ,विनयभंग तर आता खण्डणीचा गुन्हा दाखल 

वेब टीम नगर : जरे हत्या कांडांतील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यावर एक महिला अधिकाऱ्याने १० लाख रुपये खंडणी मागितल्याची व खंडणी दिली नाही म्हणून वर्तमान पात्रातून बदनामी केल्याची फिर्याद दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात बोटे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

बाळ बोठे  याच्या सह वैद्यकीय अधिकारी भागवत दहीफळे यांनाही आरोपी करण्यात आलाय. १० जुलै २०१९ ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत बोठे  व दहिफळे यांनी फिर्यादीच्या विरोधात वैयक्तिक माहितिच्या अधिकाराचा अर्ज देऊन फिर्यादीला तुम्ही कार्यालयाची परवानगी न घेता निवडणूक लढवली आहे, यातून तुम्हाला जर बाहेर पडायचे असेल तर १० लाख रुपये द्या. अशी खंडणी मागितली मात्र फिर्यादीने आरोपीस रक्कम न दिल्याने वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध करून बदनामी केल्याची फिर्याद महिलेने दाखल केली आहे. 


बाळ बोठे  याच्या विरोधात खून , विनयभंग , आणि आता खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.      


Post a Comment

0 Comments