रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापण्याचे आंदोलन

 रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापण्याचे आंदोलन 

गॅस दरवाढीवरून आंदोलंन 

 राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्माताई आठरे

वेब टीम नगर : कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात असून अशावेळी केंद्र शासनाने केलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरातील वाढीमुळे गृहीणींचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्माताई आठरे यांनी केले. ही दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक दरवाढ असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कुटंबाचे आर्थिक गणित  बिघडले असून दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे.

सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने सिध्दीबागेसमोरील रस्त्यावर चुल मांडून भाकरी भाजण्याचे आंदोलन केले असून या दरवाढीचा निषेध केला आहे.

यावेळी सुनंदा कांबळे , सुनिता पाचरणे , मनीषा सरोदे, सारिका खताडे, शितल राऊत, शितल गाडे, उषा सोनटक्के, वर्षा कुऱ्हाडे, गीता कामत , लीला डाडर , ज्योती निकम , अर्चना केदारी आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments