ट्रॅव्हल बस आणि कारच्या अपघातात ४ ठार

ट्रॅव्हल बस आणि कारच्या अपघातात ४ ठार 

वेब टीम नगर : खाजगी ट्रॅव्हल बस आणि सॅनट्रो कार अपघातात चार जण ठार झाल्याची घटना रात्री उशिरा घडली.तिसगाव नजीक देवराई जवळ हॉटेल सुभद्रा येथे घडली.

कल्याण - विशाखापट्टणम  रस्त्यावर तालुक्यातील देवराई जवळ रात्री उशिरा खाजगी ट्रॅव्हल बस व सेंट्रो कार मधील अपघातात होऊन चार जण ठार झाले आहेत. तीन जण जागीच ठार झाले तर एक जणांचा रुग्णालयात मृत्यु झाला आहे.बाळासाहेब शंकरराव कदम, वय ६० रा जायगाव ता.परळी जि. बीड,परमेश्वर लक्ष्मण डाके वय ४० रा.धामणगाव ता.पाथर्डी जि.परभणी आणि केशव विलास बोराटे वय २३ रा मंठा जि.जालना अशी  मृतांची नावे आहेत.\

सुभद्रा हॉटेल समोर त्रिभुनवाडी शिवारात खाजगी बस क्र एम एच ३८ एक्स ८५५५ ही पुण्याहून नांदेडकडे जात असतांना संट्रो कार क्र एम एच १२ सीडी २९१७ ही पुण्याच्या दिशेने चाली असतांना यांचा अपघात होऊन सँट्रो कार मधील तीन जण जागीच ठार झाले असून एक जण उपचारा दरम्यान मृत झाला आहे. 

अपघाताची खबर मिळताच देवराई येथील सामाजिक कार्यकर्ते गणेसह अकोलकर , अनिल पालवे , आशिष क्षेत्रे , प्रमोद क्षेत्रे यांनी तात्काळ मदत केली जखमींच्या मदती साठी ,महामार्ग पोलीस व पाथर्डी पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती देण्यात आली . पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना मदत केली.  

Post a Comment

0 Comments