दक्षिणेतील सुपर स्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

 दक्षिणेतील सुपर स्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल 

वेब टीम नगर : दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयानेच प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे. रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना इतर काही लक्षणं नाहीत असंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाला आहे. त्यांना इतर काही लक्षणं नाहीत. दोन दिवसांपूर्वीच ते शुटिंग करत असलेल्या चित्रीकरणाच्या ठिकाणी आठ जणांना करोनाची लागण झाली. त्यानंतर रजनीकांत यांचीही करोना चाचणी करण्यात आली पण ती निगेटिव्ह आली.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या अन्नाथे  चित्रपटाच्या सेटवर ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे खबरारीचा उपाय म्हणून रजीनकांतही क्वारंटाइन झाले होते. आता त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली. तसंच त्यांना सध्या इतर कसलाही त्रास जाणवत नसल्याचंही रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

Post a Comment

0 Comments