उत्पादन शुल्कने नऊ महिन्यात केलेल्या कारवाया

 उत्पादन शुल्कने नऊ महिन्यात केलेल्या कारवाया 

 

 वेब टीम नगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल 2020 ते 22 डिसेंबर 2020 पर्यंत नऊ महिन्याच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 32,238 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 19,462 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोबरच 2,663 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

हातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत 18,786 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 7,028 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 34 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैधपणे परराज्यातील मद्य विक्री बाबत आतापर्यंत एकूण 765 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 656 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 13 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

मद्यार्काच्या अवैध वाहतुकीबाबत एकूण 182 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 214 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर चार कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच बनावट मद्य विक्रीचे एकूण 71 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 79 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर दोन कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

हातभट्टी, परराज्यातील अवैध मद्य, अवैध मद्यार्क निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरुद्ध तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु आहे. तक्रारदार आपली तक्रार टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ आणि ईमेल excisecontrolroom@gmail.com यावर करु शकतात.

Post a Comment

0 Comments