आरोग्य आहार : मश्रुम मसाला

 आरोग्य आहार 
मश्रुम मसाला 

साहित्य : ताजे मश्रुम १ पॅक, ४ कांदे किसून , ३ टोमॅटो बारीक चिरून, ७-८ लसूण पाकळ्या व आलं वाटून, १ टी स्पून गरम मसाला, २ डाव तेल , जिरं , हळद , १ चमचा लाल तिखट , चविनुसार मीठ , थोडी कोथिंबीर बारीक चिरून. 

कृती : मश्रुम स्वछ घुवून घ्यावेत. मोठे असतील तर एकाचे चार तुकडे करून घ्यावेत. कांदे किसलेले कढईत तेलाची , जिरं, हळद घालून फोडणी करून गुलाबी रंगावर परतावेत. त्यात आलं,लसूण घालून परतावे. 

वरील मसाला खमंग परतला गेल्यावर त्यात लाल तिखट , गरम मसाला व चिरलेले टोमॅटो घालून परतावे . मसाला खमंग तेल सुटे पर्यंत परतून त्यात मश्रुम व चवीनुसार मीठ घालावे. 

वाटीभर पाणी घालून झाकण ठेऊन मश्रुम शिजल्यावर कोथिंबीर घालून उतरवावे. किंवा मश्रुम घातल्यावर मश्रुम मसाला प्रेशर पॅन मध्ये घालून २ शिट्या देऊन शिजवावे. 

गरमागरम मश्रुम मसाला रोटी किंवा चपाती डसोबत सर्व्ह करावा. 

टीप : मश्रुम बारीक चिरून , कांदे बारीक चिरून घ्यावेत. तेलावर कांदे, टोमॅटो व मसाला घालून परतून घ्यावा व मश्रुम घालून वाफेवर पाणी घालता शिजवावा . हे मिश्रण सँडविच मध्ये किंवा पिझ्झा टॉपिंग म्हणून छान लागते.  

                


Post a Comment

0 Comments