मालगाडीचे १२ डब्बे घसरल्याने मोठा अपघात
वेब टीम श्रीगोंदा : आज भल्या पहाटे दौंडकडून नगरच्या दिशेने येणाऱ्या माल वाहतूक रेल्वे चे १२ डबे रुळावरून घसरल्याने श्रीगोंदा स्थानकाजवळ मोठा अपघात झाला मात्र पहाटेच्या वेळी घटना घडल्याने या अपघातात कोणतिहि जीवित हनी झाली नाही. या अपघाता मुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
हा अपघात नेमका कसा झाला याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र या माळ वाहतूक गाडीला एकूण ४२ डबे होते त्यातील १२ डबे रुळावरुन घसरलें आहेत. या घटनेची माहिती बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना मिळाल्यावर पेट्रोलिंग करणारे पोलीस घटना स्थळी रवाना झाले. रेल्वे मार्ग रुस्त होण्यास वेळ लागणार आल्याने या मार्गावरील सर्व रेल गाड्या मागच्या स्थानकावरच थांबवण्यात आल्या आहेत. हि माल गाडी सिमेंटची वाहतूक करत होती.
0 Comments