रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद

 रात्रीच्या  वेळी बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

वेब टीम कर्जत :  फिर्यादी  जयसिग लालासाहेब शेटे, वय- ४० वर्षे, धंदा- शेती, रा. डीकसळ, ता- कर्जत हे त्यांचे राहते घर बंद करुन कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी त्यांचे घराचे दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करुन घरातील कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्‍कम ब सोन्याचे दागिणे असा एकूण ४८.५००/-रु. किं. चा ऐवज चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी कर्जत पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 गुन्हा दाखल झाल्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे श्री. अनिल कटके, पोलोस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली समांतर तपास करीत असताना सपोनि  शिशिरकूमार देशमुख यांना गोपनिय माहिती मिळाली कि,  हा पल्या भोसले, रा. बेलगांब, ता- कर्जत याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशोर माहितो मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई गणेश इंगळे, पोहेका बबन मखर,पोना सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, पोकाँ प्रकाश वाघ, रविन्द्र  घुंगासे, मेघराज कोल्हे, चालक पोना मेघराज कुसळकर अशांनी मिळून बेलगाव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून आरोपी नामे 

१) पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले, वय- २२ वर्षे, रा. बेलगांब, ता- कर्जत यांस पाटलाग करुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्वसात घेवून सदर गुन्ह्याबाबत कसून चोकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा भाऊ भगवान भोसले व साथीदार प्रितम चव्हाण अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनो आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे २) भगवान ईश्बर भोसले, वय- २० वर्षे, रा. बेलगाव, ता- कर्जत, ३) प्रितम गुटुया चव्हाण, वय- २५ वर्षे, रा. मिरजगांव, ता- कर्जत यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपोना विश्वासात घेवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरलेल्या रकमेपैकी ३५,०००/-रु.रोख रक्‍कम काढून दिल्याने सदरची रक्‍कम जप्त करण्यात आली असून चोरलेल्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता  दागिने  हे आरोपी पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले याने त्याचे आई मिनाबाई ईश्वर भोसले (फरार) हिचेकडे दिले असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. आरोपींना मुद्देमालासह कजंत पो.स्टे. ला हजर करण्यात आलेले असून पुढील कार्यवाही कर्जत पो.स्टे. हे करीत आहेत.

बरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले याचे विरुध्द  आष्टी ,नगर तालुका ,जामखेड पोलीस स्टेशन ,सांगोला ,पाथ्रडी ,कर्जत बाडी पोलीस ठाण्यात ८ गुन्हे  दाखल आहेत .तारा आरोपी भगवान ईश्वर भोसले याचे विरुध्द २ गुन्हे दाखल ,.आरोपी प्रितम गुडुया चव्हाण याचे विरुध्द १ गुन्हा दाखल आहे.

 ही  कामगिरी मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, सौरभ कूमार आगरवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक,  अण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments