जिल्हास्तरीय बेडुक सर्वेक्षणात आढळले विविध दुर्मिळ व आगळेवेगळे बेडुक

 जिल्हास्तरीय बेडुक सर्वेक्षणात आढळले विविध दुर्मिळ व आगळेवेगळे बेडुक

उभयचरवर्गीय प्राण्यांच्या प्रजातींवर प्रकाश टाकणारा राज्यातील पहिला उपक्रम

वेब टीम नगर :अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या वतीने या पावसाळ्यात पहिल्यांदाच जिल्ह्यात उभयचर प्राणी सर्वेक्षण करण्यात आले.निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या उपक्रमान्वये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पानथळ ठिकाणी  तसेच आपल्या परिसरात आढळणार्‍या बेडकांचे छायाचिञे संकलित केले गेले.या सर्वेक्षणात जिल्हाभरातील सुमारे २५ निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला तर वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ३१पेक्षा अधिक प्रजातींच्या बेडकांची नोंद घेतली.या उपक्रमात आढळुन आलेल्या वैविध्यपुर्ण बेडकांची अचुक ओळख पटवण्याचे व त्यांच्याबाबत अधिक सविस्तर माहीती व मार्गदर्शन करण्याचे कार्य राज्यातील सुप्रसिद्ध उभयचर प्राणी अभ्यासक डाॅ.वरद गीरी व प्राणीशास्ञज्ञ डाॅ.सुमन पवार यांनी केले.

सर्वप्रथम पृथ्वीवर पाण्यात जलचरांच्या रूपाने जीवसृष्टीचा उगम झाला. उभयचरवर्गीय प्राणी हे जलचर व भुचर प्राण्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहेत.निसर्गचक्रात या उभयचरांना महत्वाचे स्थान असुनही हा घटक माञ दुर्लक्षितच राहतो.या घटकांवरही जाणीवपुर्वक अभ्यास,निरीक्षण व नोंदी होणे अतिशय गरजेचे आहे या उद्देशाने या उपक्रमाचे जिल्ह्यात आयोजन केले गेले.अशा या आगळ्या वेगळ्या या उपक्रमांची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यापासुन होत आहे ही आनंदाची बाब आहे. 

-निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते 

या सर्वेक्षण उपक्रमात आशा कसबे यांनी घेतलेली बलुन फ्राॅगची नोंद,

,भट्टीवाडी(करंजी) येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेली फन्गाॅईड व देशातील सर्वात मोठ्या आकाराच्या इंडियन बुलफ्राॅगची नोंद,रविंद्र गोल्हार यांनी घेतलेली काॅमन ट्री फ्राॅगची नोंद तसेच स्नेहा ढाकणे यांनी घेतलेली राईस फ्राॅगची नोंद अशा नोंदी या वर्षीच्या सर्वेक्षणातील वैशिष्ट्यपुर्ण व महत्वाच्या ठरल्या.यांच्यासह प्रतिम ढगे,अमित गायकवाड,शिवकुमार वाघुंबरे,सचिन चव्हाण,संदिप राठोड,अक्षय पाभारे,संजय बोकंद,खुशाल शिंदे,विठ्ठल पवार,संदिप फंड,विजय परदेशी या काही मुख्य निरीक्षकांनीही या उपक्रमात आपल्या मोलाच्या नोंदी नोंदवल्या.

असा हा आगळा वेगळा उपक्रम राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला असुन निसर्गप्रेमी व अभ्यासक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.या उपक्रमासाठी जिल्हा उपवन संरक्षक अधिकारी एम.आदर्श रेड्डी यांचेही  सहकार्य लाभले असुन सहभागी झालेल्या सर्वांना त्यांच्या स्वाक्षरीचे आकर्षक सहभाग प्रमाणपत्रही दिले . जाणार आहे.


                                            इंडियन बुल फ्राॅग

                                            फन्गाॅईड फ्राॅग

                                        

                                            काॅमन ट्री फ्राॅग

                                             बलुन फ्राॅग

                                             राईस फ्राॅग

                                             इंडियन बरोविंग फ्राॅग


Post a Comment

0 Comments