नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

रमाकांत काठमोरे  शिक्षकांसाठी आयडल

 शिक्षक संघटनेच्या वतीने काठमोरे यांचा सत्कार.

वेब टीम नगर  : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील  प्राथमिक शिक्षक संघटना व शिक्षकांच्या वतीने त्यांचा जिल्हा परिषद कार्यालय अ.नगर येथे प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी एन ए.पठाण अध्यक्ष एकता एज्युकेशन सो.कास्ट्राईब शिक्षक संघटना शहराध्यक्ष  नेते प्रसाद शिंदे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना सहसचिव समिर पठाण , रवी चांदेकर ,यांनी काठमोरे यांचा सत्कार केला. तसेच याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी विलास साठे,विस्तार अधिकारी जयश्री कार्ले ,अधिक्षक जिल्हा परिषद प्रदिप शिंदे  यांनी देखील काठमोरे यांना शुभेच्छा दिल्या.

राज्य सरकारने पदोन्नतीचे आदेश जारी केले असून, काठमोरे यांची औरंगाबाद येथे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. समिर पठाण म्हणाले की, शिक्षक ते उपसंचालक म्हणून असा  प्रेरणा देणारा प्रवास हा निश्चितच शिक्षकांना आदर्श  निर्माण करुन देणारा आहे.रमाकांत काठमोरे शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्या पासून  जिल्ह्यातील   जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.  जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना कला-गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे अभ्यास  पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.या उपक्रमशील शिक्षणाधिकारी यांची पदोन्नती झाली असून, शिक्षण क्षेत्रात ते निश्‍चितच उत्कृष्ट कामगिरी बजावतील असा विश्‍वास शिक्षकांनी  व्यक्त केला आहे.नगर मधून शिक्षक म्हणून आपल्या नोकरीची सेवा सुरुवात करुन अल्पवधीच अधिकारी म्हणून नेमनुक झाली.अ.नगर मध्ये शिक्षणाधिकारी नेमणूक झाल्यापासून जिल्ह्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी काठमोरे यांनी प्रयत्न केले.निश्चितच त्यांचे यश हे शिक्षकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.काठमोरे हे शिक्षकांसाठी आयडल आहेत अशी चर्चा सर्वत्र चालू आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संजीव घोडके यांचा कार्यकाळ नवीन पिढीला मार्गदर्शक व प्रेरणा देणारे : संजय पवार

    वेब टीम  नगर : आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या कामाकडे सेवा म्हणून लक्ष दिले तरी ते काम चांगले होते. शिक्षक हा काम करतांना ज्ञानदानाचे महत्वाचे काम करतो, तसे शासकीय कार्यालयातील अधिकारी हे देखील सार्वजनिक सेवा तत्परतेने, सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक वागणूक देऊन आपले काम चोखपणे पार पाडतात. आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील संजीव घोडके यांनी देखील ३० वर्षांच्या कार्यकाळात नवीन तरुण अभियंत्यांना मार्गदर्शक व प्रेरणा देणारे असे काम करुन आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी केले.

     अहमदनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील मार्गप्रकल्प विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता संजीव संभाजी घोडके हे सेवानिवृत्त झाले, त्याबद्दल कार्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.पवार बोलत होते. याप्रसंगी रो.ह.यो.कार्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण, उपकार्यकारी अभियंता ए.बी.बडे, राकेश सयाम, सहाय्यक अधिक्षक अभियंता आनंद मेहेत्रे, उपअभियंता नंदकिशोर मिसाळ, नेवासा येथील उपअभियंता महेंद्र बनसोडे आदि उपस्थित होते.

   .पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुमारे १५०वर्षाहून जास्त अशी गौरवशाली परंपरा असलेला महत्वाचा विभाग आहे, अशा या विभागात आपल्याला काम करण्याची संधी मिळावी हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

     यावेळी सत्काराला उत्तर देतांना संजय घोडके म्हणाले की, ३० वर्षे सेवा पूर्ण केली ही करतांना सामाजिक प्रश्‍न सहानुभुतीपूर्वक सोडविण्याचा दृष्टीकोन ठेवून पूर्णपणे सोडविले याचे समाधान वाटते. मार्ग प्रकल्प विभागातील कामात रस्ते विकास योजनेतील कामे मार्गी लावले. सेवा देतांना उत्तम दर्जा व सुरक्षितेला महत्व दिले. वरिष्ठांचे मागदर्शन, स्टाफचे सहकार्य मिळाल्याने मी चांगले काम केले याचे खरे समाधान वाटते, असे म्हणाले.

     यावेळी संजीव घोडके यांच्या कामाबद्दल सर्वांनी आपल्या भाषणात गौरव केला. शेवटी घोडके परिवाराच्यावतीने आभार मानले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांना अमेरिकेचा गव्हर्नर ऑफ मेरीलँड पुरस्कार जाहीर

यूएसआयएसएमई कौन्सिल इंडियाचे संचालक मायकेल वायदेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सय्यद साबीर अली यांच्यावतीने ना. पवार यांचा सत्कार

वेब टीम मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांना अमेरिकेचा गव्हर्नर ऑफ मेरीलँड पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथे ना. पवार यांची भेट घेऊन यूएसआयएसएमई कौन्सिल इंडियाचे संचालक मायकेल वायदेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सय्यद साबीर अली यांनी या पुरस्काराच्या घोषणेचे पत्र व डॉ. बेन कार्सन यांचे पुस्तक भेट दिली. तसेच सय्यद साबीर अली यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ना. पवार यांचा मुस्लिम समाज व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

गव्हर्नर ऑफ मेरीलँड कडून २०२० या वर्षासाठी उत्कृष्ट सार्वजनिक सेवा व नेतृत्वासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मार्च २०२१मध्ये पवार यांना सदर पुरस्कार मेरीलँडचे गव्हर्नर लॅरी होगन यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. यावेळी यू.एस.ए.च्या नगरविकास राज्य सचिव डॉ. कार्सन व अलीशा बॉब पुलिव्हर्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती वायदेंडे व साबीर अली यांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महापालिकेतील सफाई कामगारांचा सातवा वेतन आयोग ,इतर प्रश्‍न सोडविण्याचे आमदार जगताप, राज्यमंत्री तनपुरे यांचे आश्‍वासन

महापालिका कामगार संघटनेच्या वतीने आमदार जगताप यांचा सत्कार

वेब टीम नगर : अहमदनगर महानगरपालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग तसेच 511 व 305 कर्मचार्‍यांना लाड समिती नुसार सफाई कामगारांना वारस हक्काने कायम नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी महापालिका कामगार संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप व नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली. आमदार जगताप यांनी दोन्ही मागण्या मंजूर होण्यासाठी लवकरात लवकर विधानसभेमध्ये ठोस निर्णय घेण्याचे व राज्य मंत्री तनपुरे यांनी सदर प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.  

नुकतेच आमदार संग्राम जगताप यांचा सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महानगरपालिका कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाब राजाराम गाडे, दादाभाऊ कळमकर, पै.अंकुश मोहिते, अनिल मंडलिक, सागर साठे, गोपीनाथ अडागळे, विठ्ठल उमाप आदि उपस्थित होते. सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप व नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे गुलाब गाडे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधधंद्यांचा सुळसुळाट

त्या सहा. पोलीस निरीक्षकाची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी

अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेचा उपोषणाचा इशारा

वेब टीम नगर : एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नसून, या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधधंद्यांचा सुलसुलाट झाला आहे. तसेच तक्रार करणार्‍यांवरच पोलीस व अनाधिकृत व्यवसाय करणारे गुंड दमबाजी करत असल्याचा आरोप करुन छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा. सहा. पोलीस निरीक्षक यांच्या कामकाजाची चौकशी करुन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास शनिवार दि.२६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टाळेबंदी काळात खाजगी फायनान्स कंपन्यांनी गुंडांना हाताशी धरुन पठाणी पध्दतीने अवाजवी हप्ता वसुली केली. सदर फायनान्स कंपन्यांवर कारवाई होण्यासाठी दि.२६ नोव्हेंबर रोजी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. फायनान्स कंपन्यांवर कारवाई संदर्भात चौकशीचे आदेश दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. दीपक चांदणे यांनी ५ डिसेंबर रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून योग्य तपास करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा. पो.नि. मोहन बोरसे यांना योग्य चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले व चांदणे यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला पाठविले. चांदणे यांनी सहा. पो.नि. बोरसे यांची भेट घेतली असता बोरसे यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरुन धमकाविले व पोलिस स्टेशन मधून हाकलून लावले.

सर्वसामान्य नागरिकांना एका पोलीस अधिकारीकडून अशी अपमानास्पद वागणुक मिळणे निंदनीय बाब आहे. बोरसे यांची एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाल्यापासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार व अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहे. गुन्हेगारांना अभय मिळाले असून, सर्व प्रकरणे दडपले जात आहे. पांढरीपुल, खोसपुरी शिवारात पोलीसांच्या आशिर्वादाने मटका, जुगार राजरोसपणे सुरु आहे. ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्याचा उपयोग झालेला नाही, उलट तक्रारदारांना गुन्हेगारांकडून मारहाण झालेली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे नेमणुकीस व कार्यरत असलेले सहा. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मागासवर्गीय कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लँड माफियाला तडीपार करा

अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी

 बहुजन समाज पार्टीच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन

वेब टीम नगर : मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर जातीयद्वेषातून हल्ला करणार्‍या लँड माफिया दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांना तडीपार करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल व्हावा व अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, विधानसभा अध्यक्ष प्रतिक जाधव, शहराध्यक्ष संतोष जाधव, विधानसभा बीव्हीएफ अतुल काते उपस्थित होते.

१५ डिसेंबर रोजी निर्मलनगर शिरसाठ मळा येथील मंदा अरुण ठोकळ यांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्यादिवशी आरोपी दीपक सावंत व त्याचे साथीदार अक्षय थोरवे, तुषार थोरवे, गजानन सावंत व इतर दहा ते पंधरा साथीदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात येऊन जातीवाचक शिवीगाळ केली. खालच्या जातीच्या लोकांनी या भागात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही असे धमकावले. कार्यक्रम सुरु असल्याचा राग धरुन लँड माफिया दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांनी ठोकळ कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अरुण ठोकळ हे गंभीर जखमी झाले असून, ते एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तसेच ठोकळ कुटुंबीयातील महिलांना देखील मारहाण झाली आहे. आरोपींनी ठोकळ कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करून, त्यांच्या घराची नासधूस केली व त्यांची सहा वाहने जाळण्यात आली. आरोपी हे गुंड व जातीयवादी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याकडून ठोकळ कुटुंबीयांना धोका आहे. तरी लँड माफिया दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांना तडीपार करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल व्हावा व अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जुन्या गीतांच्या गोडव्यामुळे आजही मोठया प्रमाणात पसंती :अ‍ॅड.अमिन धाराणी

वेब टीम नगर : गीत-संगीत आज असे झाले आहे की, या शिवाय कोणाचीही करमणुक होतच नाही. टीव्हीवर सुद्धा गीतांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात रसिक बघतात. अनेक युवा कलाकार सुद्धा जुन्या गीतांनाच पसंती देतात, सादरीकरण करतात त्याचे एकमेव कारण म्हणजे गाण्यांच्या गोडव्यांमुळे त्याकडे रसिक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात, असे प्रतिपादन संगीतप्रेमी अ‍ॅड. अमीन धाराणी यांनी केले.

म्यूज़िकल स्टार्स फेसबुक लाईव्हच्यावतीने महान कलाकार दिलीप कुमार यांच्या ९८ व्या वाढदिवसानिमित ‘सुहाना सफर’ या गीतांची महेफिल रहेमत सुलतान सभागृहात शासनाच्या नियमानुसार आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीतप्रेमी सईद खान, मनोज डफळ, संजय माळवदे, विकास खरात, शौकत विराणी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात अ‍ॅड.अमीन धाराणी, अँड.गुलशन धाराणी, सुनिल भंडारी, दिपा भालेराव, किरण उजागरे, समीर खान, डाँ.रेश्मा चेडे, राजु सावंत, सुनिल तेलतुंबडे आदिंनी गीते सादर केली.

या महेफिलीत जुनी गीते सादर करुन रसिकांना जुन्या काळच्या आठवणी व सिनेमाच्या आठवणींना गायकांनी उजाळा दिला. टाळ्यांच्या गजरात या हौसी कलाकारांचे संपूर्ण सभागृहाने कौतुक केले. शाबासकीची थाप दिली व बक्षिसांचाही वर्षाव केला.

अशा सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी उत्तमरित्या शेर-शायरी करुन रसिकांना गीतांशी जोडण्याचे काम केले. आभार कार्यक्रमाचे टेक्निशियन साहिल धाराणी यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर खाली चिमुरडीचा चिरडून मृत्यू

ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेच्या वतीने 

आर्थिक दुर्बल घटक असलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी

वेब टीम नगर : पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या जवळ ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर खाली एका चिमुरडीचा चिरडून मृत्यू झाला. सदर घटनेत आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मयत मुलीच्या कुटुंबीयांना मदत  मिळण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेच्या वतीने बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये पो.नि. अरविंद माने यांना देण्यात आले.

कुकडी सहकारी साखर कारखान्यात ऊस नेत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली काजल अशोक पाडळे (वय- 12 वर्षे) ही मुलगी दुर्दैवी मयत झाली. ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने जात असल्याने चिमुरडी ट्रॅक्टरच्या खाली आली. सदर घटना शुक्रवार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी घडली. मुलीचे वडील अशोक पाडळे हे एका पायाने अपंग आहे व आई-वडील दोघेही मजूर काम करतात. त्यांना खर्‍या अर्थाने आर्थिक मदतीची गरज आहे. ज्या ट्रॅक्टरने अपघात घडला त्या ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नाही व कसल्याही प्रकारचा विमा नाही. दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉली क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊसाने भरलेल्या होत्या. या चुकीच्या गोष्टीमुळे एका मुलीला आपला जीव गमवावा लागला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ट्रॅक्टरला एकच ट्रॉली लावल्यास चालकाला योग्य अंदाज येऊन अपघात घडणार नसल्याचा मुद्दा दादासाहेब पाडळे यांनी मांडला. सदर कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी गावचे सरपंच सचिन पाडळे, ऊस तोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाडळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments