४२ व्या कम्युनिकेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

 ४२ व्या कम्युनिकेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

वेब टीम श्रीहरीकोटा :आज इस्त्रोच्या इतिहासात आणखी एक नवं पान लिहिलं गेलं . ते म्हणजे इसरोने  आज दुपारी ३ वाजून ४१ मिनीटांनी भारताचा नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतिश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं आहे. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून 25 तासांचे काउंटडाउन सुरु होतं.PSLV या शृंखलेतील हेब २२ वे प्रक्षेपण आहे. 

CMS-01 हा भारताचा 42 वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून भारतीय मुख्य भूमीसोबतच अंदमान- निकोबार आणि लक्षद्विप ही बेटंही कव्हर करण्यात येणार आहेत. हा उपग्रह सात वर्षापर्यंत काम करेल असं सांगण्यात आलं आहे. PSLV-C50 या 44 मीटर उंचीच्या सॅटेलाईटमध्ये चार स्टेजच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे प्रक्षेपण PSLV या प्रकारातले 22 वे यशस्वी प्रक्षेपण आहे.

 या वर्षातले इस्त्रोचं हे दुसरं प्रक्षेपण आहे. या आधी नोव्हेंबरच्या सुरुवातीला इस्त्रोने EOS-01 अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण केलं होतं.


Post a Comment

0 Comments