हिंदूजनजागृती समितीच्या वतीने मुखमंत्र्यांचे अभिनंदन

हिंदूजनजागृती समितीच्या वतीने  मुखमंत्र्यांचे अभिनंदन  

वेब टीम नगर : राज्य सरकारने सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेस साठीची संहिता निश्चित केली.कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत  हिंदू जनजागृती समितीने केले आहे. त्याच बरोबर  राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरुप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्यासाठी ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणी केली आहे.

 समितीच्या वतीने तसे पत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली, व तसा बोर्ड देखील मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावला. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन  काढू, असा इशाराच दिला होता. त्यानंतर या वादात हिंदू जनजागृती समितीनेही उडी घेतली होती. शिर्डी येथील साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार पोषाख लागू करावा, असे आवाहन सर्व मंदिर विश्वस्तांना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी केले आहे. 

आता राज्य सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीगणवेश संहिता  निश्चित केली , व यानिमित्ताने पुन्हा एकदा हिंदू जनजागृती समितीने सर्वच मंदिरामध्ये ड्रेसकोड लागू करण्याची मागणी केली आहे. हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.  काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे अनुसरणीय आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.



Post a Comment

0 Comments