ट्रक- दुचाकीच्या अपघातात लोणी व्यंकनाथचे ४ ठार

 ट्रक- दुचाकीच्या अपघातात लोणी व्यंकनाथचे ४ ठार 

वेब टीम श्रीगोंदे  : दौंड महामार्गावरील पवारवाडी शिवारात आज (दि.९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रक व दुचाकींचा अपघात झाला. या उपघातात लोणी व्यंकनाथ येथील तिघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्याने लोणी व्यंकनाथ गावावर शोककळा पसरली आहे.

समजलेली माहिती अशी, प्रतिक नरसिंग शिंदे, राजकुमार विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे आणि राहुल बाजीराव बरकडे हे चौघेही दुचाकीवरून लोणी व्यंकनाथ गावात जात होते. पुढे जात असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना त्यांना समोरून (नगरकडून) येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दली. ही धडक इतकी जोराची होती की या अपघातात तिघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारासाठी रुग्णालायत घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. 

अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. अपघाताची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक अमित माळी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालकास पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. झालेल्या अपघातात एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने लोणी व्यंकनाथ गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments