त्यांनी ते नीट वाचलेलंच नाही : शरद पवार

 त्यांनी ते नीट  वाचलेलंच नाही : शरद पवार 

वेब टीम नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली.  दोघांमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी २०१० मधील त्या पत्रावरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचंही शरह पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

२०१० मधील त्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे. कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात ते पत्र लिहिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. तसेच  त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असंही पवार म्हणाले आहेत. एवढंच नाही तर 'आता जे तीन नवे कृषी कायदे आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही.', असंही शरद पवार म्हणाले आहेत.


Post a Comment

0 Comments