शेतकरी विधेयक मागे घ्या : अविनाश घुले

 शेतकरी विधेयक मागे घ्या : अविनाश घुले


वेब टीम नगर : शेतकरी विरोधी कायदा रद्द करा या मागणीसाठी आज दिनांक आठ रोजी या कायद्याला विरोध करणाऱ्या सर्व विरोधी पक्षांनी मार्केट यार्ड चौक येथे निदर्शने करून आपला विरोध व्यक्त केला डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको करण्यात येऊन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्यात त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. 

या आंदोलनाच्या प्रारंभी काँग्रेस सुधीर टोकेकर कॉम्रेड सुभाष लांडे हमाल पंचायतीचे अविनाश घुले भैरवनाथ वाकळे आदींची भाषणे झाली त्यात केंद्र शासनाने शेतकऱ्यांची गळचेपी करणारे मुद्दे विधेयकात घातल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे व या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या काळा मोडण्याची वेळ आली असल्याचे अविनाश घुले यांनी म्हटले आहे. 

यावेळी सुधीर टोकेकर कॉ.  सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे आदींची भाषणे झाली त्यानंतर मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको करण्यात आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.

Post a Comment

0 Comments