दाक्षिणात्य सुपरस्टारला धमकी

 दाक्षिणात्य सुपरस्टारला धमकी 

वेब टीम चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार चियान विक्रम याला त्याचं घर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. नुकतीच  एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याला ही धमकी दिली. धमकी मिळताच विक्रमनं पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी देखील बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या मदतीनं त्याच्या घराची कसून तपासणी केली. परंतु त्यांना कुठलाही प्रकारचा बॉम्ब सापडला नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

विक्रम चेन्नईतील बेसंट नगर इथे राहातो. या भागात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी राहतात. गेल्या काही काळात या भागात राहणाऱ्या विजय, अजित, सुर्यकांत, रजनीकांत, सूर्या यांना देखील असे धमकीचे फोन आले होते. दरम्यान पोलीस फोन करणाऱ्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मानसिकरित्या आजारी असलेला व्यक्ती असे फोन करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे.

Post a Comment

0 Comments