ट्रोलरवर भडकली तापसी

 ट्रोलरवर भडकली तापसी 

वेब टीम मुंबई : सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यातच सेलिब्रिटींचं ट्रोल होण्याचं प्रमाण अधिक असतं. काहीजण अशा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात कर काहीजण त्यांना सडेतोड उत्तर देतात. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने नुकत्याच एका ट्रोलरला बेधडक उत्तर दिलं आहे. या ट्रोलरने तापसीला इन्स्टाग्रामवर ‘डीएम’ (डायरेक्ट मेसेज) केले होते. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत तापसीने त्याला उत्तर दिलं

‘फालतू हिरोईन.. तुझे ऍक्टिंग तो आती नहीं, उठा उठा के मूव्ही करती है’, असा मेसेज त्या ट्रोलरने तापसीला केला. त्यावर तिने उत्तर दिलं, ‘एक्झॅक्ट्ली क्या उठा उठा के? क्युंकी उठाया तो है मैने.. स्टँडर्ड. पर आपको शायद नहीं समझ आया’ (अभिनयाची पातळी मी उंचावर नेली पण कदाचित तुम्हाला ते समजलं नाही.) यानंतर त्या ट्रोलरने तापसीला पुन्हा मेसेज करत शिवीगाळ केली. त्याचाही स्क्रिनशॉट शेअर करत तापसीने लिहिलं, ‘ओह.. किती सातत्य आहे तुमच्या कामात. अजून चार-पाच वेळा हेच म्हणालात तर मी ऐकून घेईन.’

तापसी सध्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यानंतर ती ‘लूप लपेटा’ या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात करेल.

Post a Comment

0 Comments