उद्या बँका बंद

 उद्या बँका बंद 


वेब टीम मुंबई  : बँकांची कामं रखडायची नसतील  तर आज आणि शुक्रवारी बँकेची कामे उरकून घ्या नाही तर कामे उरकण्यासाठी थेट डिसेंबर महिना उजाडण्याची वाट पाहावी लागेल. 

पाच लाख बँक कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संपाची हाक दिली असल्याने उद्या सर्व बँका बंद राहतील. शुक्रवारचा दिवस सोडल्यास पुन्हा शनिवार , रविवार आंणि सोमवारच्या दिवशी गुरु नानक जयंतीची सुट्टी असल्याने बँक उघडण्यासाठी थेट मंगळवारची वाट पाहावी लागेल. बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात हि संपाची हाक असून त्या निमित्ताने पाच लाख बँक कर्मचारी १ दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत. 

एकीकडे आत्मनिर्भर भारत सारखी घोषणा करायची तर दुसरीकडे नफ्यात असलेल्या बँकांचं खाजगीकरण करायचं असं दुटप्पी धोरण केंद्र सरकारनं बँकाच्या बाबतीत अवलंबल्यानं या धोरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संपाचं हत्यार उपसले आहे .  

Post a Comment

0 Comments