आरोग्य आहार
व्हीट ब्रेड उत्तपा
साहित्य : व्हीट ब्रेड स्लाइस ५-६ , ढोबळी मिरची (लाल,हिरवी,पिवळी),कांदा , स्वीट कॉर्न वाफवलेले, आले लसूण मिरची पेस्ट, मीठ , ताक , बटर.
कृती : प्रथम ब्रेडच्या कडा कापून घ्या. ब्रेड स्लाइस टाकत भिजवून ठेवा. चांगले भिजल्या नंतर उत्तापाच्या बॅटरप्रमाणे ताक आणि ब्रेडचे मिश्रण तयार करून घ्यावे, मीठ व जिरेपूड घालून ठेवावे. आलं लसूण मिरची पेस्ट टाकावी. तव्यावर बटर टाकून उत्तपाचे बॅटरचे तव्यावर छोटे पुरी एवढे उत्तपा टाकावेत त्यावर ढोबळी मिरची, कांदा , स्वीट कॉर्न टाकून झाकण ठेवून वाफवून घ्यावेत दोन्ही बाजूने गुलाबीसर रंगावर भाजून घ्यावे.
ओले नारळ व कोथिंबिरीच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
शक्यतो मैद्याऐवजी गव्हाचाच ब्रेड वापरावा तो नेहमी वापरू नये. महिन्यातून एक वेळेस काहीच हरकत नाही.
0 Comments