नगर बुलेटिन

 नगर बुलेटिन 

संस्कारक्षम पिढी घडविण्यात जिल्हा वाचनालय अग्रेसर- अनंतराव वाघ

   वेब टीम नगर : महासत्तेचे स्वप्न उराशी बाळगुण असलेल्या भारत देशातील उगवत्या पिढीला वाचन संस्कृतीतून घडविण्यात अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे योगदान अमुल्य असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंतराव वाघ यांनी केले.

     वाचनालयाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष अजित रेखी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, वाचनालयाचे संचालक दिलीप पांढरे, किरण आगरवाल, अनिल लोखंडे, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे, दीपा निसाळ वाचनालयाचे ग्रंथपाल संदिप नन्नवरे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल उपस्थित होते.

     अनंतराव वाघ यांनी पुढे बोलतांना म्हणाले, जिल्हा वाचनालयाच्या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे राजाराम मोहनरॉय प्रतिष्ठानने १९९२ ते २०१९या काळात सुमारे ११,९२५पुस्तके देणगी दाखल दिली आहेत; यापुढेही जिल्हा वाचनालयाच्या आधुनिकीकरणासाठी प्रतिष्ठान सर्वोतोपरि अर्थसहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

. वाघ यांचा सन्मान वाचनालयाचे उपाध्यक्ष अजित रेखी तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी गाडेकर यांचा सत्कार दिलीप पांढरे यांनी केला. आभार गणेश अष्टेकर यांनी मानले. यावेळी ग्रंथालय कर्मचारी-वाचक उपस्थित होते.


महाराष्ट्रातील प्रत्यक निवडणूक लढवणार -डॉ गफ्फार कादरी

   वेब टीम नगर - महाराष्ट्र बरोबरच बिहारमध्येही एमआयएम पक्षाचे 5 आमदार निवडून आल्याने कार्यकर्तेमध्ये उत्साह निर्माण झाले आहे. बिहारचा विजय हा सामान्य जनतेचा विजय आहे. ज्याप्रमाणे बिहारमध्ये आम्हाला यश आले आहे; त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना समोर जाण्याची तयारी एमआयएम ने केली असल्याचे एमआयएम  प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी यांनी अहमदनगर येथे सांगितले.

     डॉ. गफ्फार कादरी पक्ष बळकट करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात दौरे करत आहेत. नगरमध्ये आले असता  एमआयएमच्या कार्यालयात  जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांच्या हस्ते स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समन्वयक सोहल जलील,  जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, कारी अब्दुल कदीर, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज शेख, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, विद्यार्थी शहर अध्यक्ष अमीर खान, शेख साहेब, सनाउल्लाह तांबटकर, इरफान शेख आदी उपस्थित होते.

     पुढे बोलतांना डॉ.गफ्फार कादरी म्हणाले, औरंगाबाद येथुन जी मदत लागेल ती पूर्ण देण्याचेही आश्‍वासन दिले. लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका मध्ये समविचारी पक्षाला एकत्र घेऊन पूर्ण ताकतीने निवडणुका लढू असेही त्यांनी सांगितले.   एम आय एम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील होणार्‍या निवडणुका संदर्बात माहिती दिली असता डॉ कादरी यांनी तयारीला लागण्याचे संकेत दिले.

केडगाव भागात चोरीचे सत्र : गस्त वाढविण्याची मागणी - विजय पठारे 

वेब टीम नगर- दिवाळी सणा निमित्त बाहेर गावी गेलेले अनेक परिवार आता आपआपल्या घरी परतत आहे परंतु बंद घर असल्याने त्यांना त्यांचे घरी चोरी झाल्याचे लक्षात येत आहे केडगाव भागातील अनेक भागात गेल्या काही महिन्यापासून भूषणनगर ,शिवाजीनगर ,लिंक रोड ,वैष्णव नगर ,लालनगर ,एकनाथनगर ,मराठा नगर या भागामध्ये घरफोडी ,जबरी चोरी ,दरोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढलेले आहे यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने या भागामध्ये रात्रीची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणीचे निवेदन नररसेवक विजय पठारे यांनी या भागातील नागरिकासह कोतवाली पोलीस यांना दिले आहेत यावेळी प्रफुल साळुंके ,चेतन वर्मा ,सागर कणसे ,चेतन राऊत ,सोनू परदेशी आदी उपिस्थत होते . 

वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार -अनिल महाराज वाळके

अ.भा. वारकरी मंडळाच्या वतीने वडगाव गुप्ताला संत वारकरी मेळावा उत्साहात

वेब टीम नगर- वारकरी संप्रदायाची शिकवण मठात न ठेवता घरोघरी पोहचविण्याचे कार्य अ.भा. वारकरी मंडळ करीत आहे. संत संगतीने उदयास आलेल्या संघटनेचा भविष्यकाळ उज्वल आहे. लवकरच ग्रंथ ज्ञानेश्‍वरीचे पारायण सोहळा अमेरिकेत होणार असून, याची तयारी सुरु आहे. वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार असल्याचा विश्‍वास अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी व्यक्त केला. तर जागा उपलब्ध करुन दिल्यास संघटनेच्या पुढाकाराने राज्यातील पहिले वारकरी भवन जिल्ह्याच्या शहरालगत उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 वडगाव गुप्ता (ता. नगर) दत्त मंदिर येथे झालेल्या अ.भा. वारकरी मंडळाच्या संत वारकरी मेळावा व नगर तालुका कार्यकारणी नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात अनिल महाराज बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनगरवाडी विठ्ठल आश्रमचे ह.भ.प. बाळकृष्ण महाराज केद्रे, संत संमेलन प्रमुख ह.भ.प. अतुल महाराज आदमाने, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज डोंगरे, सहाजिल्हाध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज शिरसाठ, जिल्हा उपाअध्यक्ष राम महाराज उदागे, मंहत साध्वी नर्मदा चैतन्य माताजी, रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते, ह.भ.प. लक्ष्मण महाराज गव्हाणे, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, नवनागापूरचे उपसरपंच डॉ. बबनराव डोंगरे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, वारकरी व परिसरातील भाविक उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटकाळात देखील स्त्रीयांनी

 आपले कर्तुत्व सिध्द केले -निर्मला चौधरी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात योगदान देणार्‍या महिलांचा सन्मान

वेब टीम नगर - कोरोनाच्या संकटकाळात पिडीत महिलांना आधार देणारी, चौकात उभी राहून बंदोबस्ताला सज्ज असलेली, ग्रामीण रुग्णालयात सेवा देणारी, कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करणारी, गावा-गावात कोरोनाचे प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणार्‍या, महसुल विभागात ऑनलाईन तक्रारीचे निवारण करणारी, कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देणारी, टाळेबंदी काळात बालविवाह रोखण्यापासून ते भाजी विक्री करणार्‍या व शेती फुलवणार्‍या कर्तुत्ववान महिलांचा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने कोरोनायोध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हॉटेल सुवर्णम प्राईड येथे न्यायाधार संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड. निर्मला चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बालविकास अधिकारी विजयामाला माने, गीता गिल्डा, निर्मला भंडारी, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील आदींसह महिला उपस्थित होत्या.

आरपीआयच्या आरती बडेकर, ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका प्रमोदीनी शिरसाठ, नागरदेवळे सरपंच सविता पानमळकर, वाहतुक पोलीस पुष्पा सोनवणे, महसुल विभागाच्या तृप्ती लगड, पत्रकार मनिषा इंगळे, कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉ. प्राजक्ता पारधे, रामकृष्ण विद्यालयाच्या प्राचार्या गीता गिल्डा, सामाजिक कार्यकर्त्या जया पुंड, पुजा सोनवणे, महिला बाल विकास अधिकारी विजयामाला माने, घरकाम करणार्‍या सुनिता पाखरे, अंगणवाडी सेविका सुवर्णा रासकर, भाजी विक्रेत्या हसीना शेख, कृषी सहाय्यक अधिकारी उज्वला शेळके यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कोरोनायोध्दा पुरस्कार देण्यात आला.

स.पा. च्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वेब टीम नगर - समाजवादी पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळवणार्‍या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष अजीम राजे समवेत समाजवादी पार्टी श्रीरामपूर शहराध्यक्ष इमरान इराणी, तालुका अध्यक्ष फय्याज कुरेशी, आर्किटेक फिरोज शेख, हाजी कुद्दुस तांबटकर, माजित पवार, अमान पठाण, शहनवाज शेख आदी समाज बांधव उपस्थित होते.    

नुकतेच झालेल्या बीई मेकॅनिकल इंजिनीयर परीक्षेत नबील खान प्रथम श्रेणीत, हमजा तांबटकर सिव्हिल डिप्लोमात उत्तीर्ण तर अनस खान याने बीई मेकॅनिकलमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम समाजातील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणानेच बदल घडणार असून, भावी जीवनात यश संपादन करता येणार असल्याची भावना समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी व्यक्त केली.


 श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखान्याच्या

 परिसरातील अवैध धंदे बंद करा               

   वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेची मागणी                              


 वेब टीम नगर- श्रीगोंदा तालुक्यातील चार ही साखर कारखान्यावरील सर्व अवैध धंदे दारू, मटका, जुगार, सोरट, हे बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटना च्या  जिल्हा अध्यक्ष अनिल (दादासाहेब) पाडळे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे व बेलवंडी पोलीस ठाणे येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. ऊस तोड कामगार हा पहाटे थंडीत शेतामध्ये चार वाजेच्या सुमारास ऊस तोडणी साठी कामाला जातात संध्याकाळी कष्ट करून येतात उसाचे वाडे विकून चार पैसे कमवून आल्यानंतर त्या ऊस तोडणी मजुराचे पैसे जुगार, दारू, मटक्यात जातात काही वेळेस त्यांचे मुलं बाळ कुटुंब उपाशी राहतात यासाठी येथील अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष  अनिल दादासाहेब पाडळे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे व बेलवंडी पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे हे अवैद्य धंदे बंद न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांच्या नेतृत्वाखाली 
 मुख्याद्यापकांशी दोस्ती  अभियान संविधानदिना पासून प्रारंभ

वेब टीम नगर – माहिती अधिकार कायदा नागरिकांना मिळालेला हक्क आहे.नागरिकांचा हक्क व अधिकारी कर्मचारी यांचे अंमलबजावणीचे कर्तव्ययाची सांगड बसावी म्हणून माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांच्या नेतृत्वाखाली संवाद मुख्याद्यापकांशी दोस्ती माहिती अधिकार कायद्याशी हे अभियान दि.२६ नोव्हेंबर रोजीसंविधानदिनापासून सुरु करण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार  संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.कायदा लागू होऊन पंधरावर्ष पूर्ण झाली व सोळावे वर्ष सुरु झाले.

या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक विद्यालयातील हजारोमुख्याद्यापकांना, कर्मचाऱ्यांना यशदाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणाला अनेक मुख्याद्यापकांनी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारलेलीअसल्याचेही लक्षात आले आहे. प्रशिक्षणानंतर कायद्याची योग्य अमलबजावणीसाठी कार्यालय प्रमुख म्हणून मुख्याद्यापकांनीकार्यालयात काही बदल, काही सुधारणा करणे अपेक्षित होते. त्या बाबतचे सोशल ऑडीट होणे अपेक्षित असल्याने हे अभियान संस्थेने सुरु केले आहे.कार्यालय प्रमुखांनी योग्य अमलबजावणी न केल्यास त्याबाबत शासन परिपत्रक आल्याने अनेक मुख्याद्यापकांच्या थेट आयोगाकडे तक्रारी गेलेल्या आहेत, आयोगाने त्याबाबत गंभीर दखल घेतली असू शिक्षण विभागाला कारवाईच्या सूचना व आदेश दिलेले आहेत.



Post a Comment

0 Comments