रौनक गुंदेचाने बनविला ‘लोहगड’

 रौनक गुंदेचाने बनविला ‘लोहगड’

     वेब टीम नगर - सारसनगर, जैन स्थानक समोर राहणार्‍या  रौनक सागर गुंदेचा याने दिपावलीनिमित्त लोहगड हा किल्ला साकारला आहे. ८ बाय ८ स्क्वेअर फुटामध्ये हा किल्ला बनविला असून, अत्यंत बारकाईने मूळ किल्ल्याचे निरिक्षण करुन त्याप्रमाणे हुबेहुब हा किल्ला साकारला आहे.

      रौनक हा इ.७ वी मध्ये सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये शिकत असून, गड-किल्ले याबाबत त्यास मोठे आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गड-किल्ले याबाबत तो नेहमीच अभ्यास करत असतो. दरवर्षी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवतो. यंदाच्या वर्षी जिद्दीने अभ्यासपूर्ण हा लोहगड किल्ला पाच दिवस परिश्रम करुन बनविला आहे. त्याने बनविलेला किल्ला पाहण्यासाठी अनेक नागरिक येत असून, त्यांच्या कला-कौशल्याचे कौतुक करत आहे.

Post a Comment

0 Comments