ब्रटिशांच्या विरोधात झांशीची राणी लक्ष्मीबाई शर्थीने लढली

 ब्रटिशांच्या विरोधात झांशीची राणी लक्ष्मीबाई शर्थीने लढली

नगर,भिंगार काँग्रेस च्या वतीने जयंती सोहळा साजरा 

वेब टीम नगर - ब्रिटनच्या विवरोधात झांशीची राणी शर्थीने लढली भारत आज स्वतंत्र आहे.त्यासाठी १५० वर्षे इंग्रजांविरोधातील लढ्यात राणी लक्ष्मीबाईंचा काळ हा सुरवातीचा होय. त्यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्याला हादरा दिला होता. अश्या थोर स्वातंत्र्यसेनानी , देशभक्त झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती काँग्रेसच्या वतीने नगर येथे साजरी करण्यात आली.

कोवळ्या वयात ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारी झांशीची राणी विरांगनाच होती. त्याच्या कर्तृत्वामुळे त्या इतिहासात अजरामर झाल्या अश्या शब्दात राणी लक्ष्मीबाईंचा गौरव उपस्थितांनी केला. प्रारंभी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, राणी लक्ष्मीबाईंच्या चरित्रातील अनेक प्रसंग वक्त्यांनी कथन केले. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ , भिंगार शहराध्यक्ष ॲड.आर.आर.पिल्ले, जेष्ठ कार्यकर्ते अनिल परदेशी,ॲड.नरेंद्र भिंगारदिवे, कवी. विवेक येवले आदिंची समयोचित भाषणे झाली. काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान,अज्जूभाई,एम.आय.शेख, मुकुंद लखापती आदींनी कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतले.        


Post a Comment

0 Comments