मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वेब टीम नगर - शहाजी रोड व्यापारी मंडळ व अल्ताफभाई मित्र मंडळच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळवणार्‍या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक दत्ता कावरे, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अल्ताफ पवार, इरफान राठोड, खालिद शेख, जुनेद शेख, इमरान गुरु, अ‍ॅड. अरविंद शितोळे, सलीम रंगरेज, नईम जहागीरदार, शौकत सर, गफ्फार शेख आदी समाज बांधव उपस्थित होते. 

नुकतेच झालेल्या बीई मेकॅनिकल परीक्षेत नबील खान प्रथम श्रेणीत, हमजा तांबटकर सिव्हिल डिप्लोमात उत्तीर्ण तर अनस खान याने बीई मेकॅनिकलमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम समाजातील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणानेच बदल घडणार असून, भावी जीवनात यश संपादन करता येणार असल्याची भावना अल्ताफ पवार यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments