मंदिरं खुली झाल्यानंतरचा पहिला कार्यक्रम

मंदिरं खुली झाल्यानंतरचा  पहिला कार्यक्रम 

झेंडीगेट हनुमान मंदिरात ५६ भोग संपन्न 


वेब टीम नगर- २४२ दिवसांनंतर राज्यातील मंदिरं उघडण्यात आली. नगर शहरात काल मंगळवारी झेंडीगेटच्या हनुमान मंदिरात ५६ भोगचा सोहळा उत्साहात झाला. दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाला ५६ प्रकारच्या अन्न पदार्थांचा नैवैद्य दाखवून विधिवत पूजा आराधना करण्याची परंपरा आहे. या परंपरेच्या आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजक आणि भक्तांना अंतर्पथ्य पाळत हा सोहळा साजरा केला. गोड,आंबट, खारट ,तुरट , तिखट अश्या सर्व प्रकारच्या चवींचे ५६ प्रकारचे पदार्थ मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आले होते. जागृत मूर्ती जवळ श्रीकृष्ण रुक्मिणीची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यासमोर ५६ प्रकारच्या नैवैद्याची आकर्षक मांडणी राहुल कावट यांनी केली होती. फुलांची सुंदर सजावट, विद्युत रोषणाई आणि मंदिर उघण्यात आल्याच्या आनंदात भक्तांनी भक्ती गीतांसह उपासनेच्या पारंपरिक पद्धतीनुसार विधिवत पूजा केली. 

मंदिराचे प्रमुख रामदास कावट यांनी सांगितलेकी ५६ भोगांचा हा सोहळा अत्यंत मोजक्या भाविकांत यंदा साजरा होत आहे. सोहळ्याचा मुहूर्त चुकला नाही. मात्र सालबाद प्रमाणे गर्दी होऊ दिली नाही. यापुढील मंगळवारीही हनुमान चालीसा आणि शनिवारी सुंदर कांडचे पठाण होणार आहे त्या वेळीही अशीच दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगितले. साईनाथ कावट आणि भक्तांनी परिश्रम घेऊन सोहळा यशस्वी केला. यावेळी सालासार सत्संग मंडळाचेही सहकार्य लाभले. 


Post a Comment

0 Comments