धर्मवीर संभाजी राजांचा अखेरचा प्रवास अर्थात बहादूर गड

धर्मवीर संभाजी राजांचा अखेरचा प्रवास अर्थात बहादूर गड

छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडाने बांधून त्यांची जीभ छाटण्यात आली, डोळे फोडण्यात आले ही दुर्दैवी घटना जिथे घडली ते ठिकाण पेडगाव तालुका श्रीगोंदा येथे आहे.  संभाजीराजांना कपटाने अटक करून या गडावर नेण्यात आले, तोच हा पेडगाव गड आहे.  यावेळी औरंगजेबाने लाखोंचे सैन्य तैनात  केलं होतं.  त्यावेळी संभाजी राजांचा छळ करण्यात आला. ते प्रसंग  ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.  हिंदवी स्वराज्याचा इतिहासातील ही घटना अत्यंत दुःखदायक आहे.  पण या प्रसंगी राजांनी शरणागती पत्करून हार मानली नाही.  उलट  हिंमत दाखवून छळ सहन  केला धर्म बदलण्याची सक्ती त्यांच्यावर करण्यात आली, पण त्यांनी जीव वाचवण्यासाठी धर्म बदलला नाही, म्हणूनच ते धर्मवीर आणि ज्या गडावर त्यांचे अतोनात हाल   केले गेले तिथे राजांनी बहाद्दरपणे त्याला तोंड दिले ,म्हणून त्या गडाला बहादूर गड म्हटले जाते.  राजांचा अभिमान वाटावा असा हा प्रसंग आणि त्यांची आठवण या गडावर आल्यावर लक्षात येते . अलीकडे या गडाला धर्मवीरगड असे नाव देण्यात आले आहे. 

संभाजीराजांचं हे अखेरचे युद्ध होतं त्यात त्यांना प्राण गमवावा लागला पण देशप्रेम स्वाभिमान धर्मनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जागृत ठेवण्याचे काम त्यांनी याप्रसंगी केले . त्यांच्या बरोबर कवी कलशही होते.  त्यांचेही असेच हाल झाले पण त्यांनीही राजांची साथ सोडली नाही स्वामीनिष्ठ कलश यांना राजे मित्र म्हणत यावेळी राजायांचे सर्व शरीर रक्ताने लाल झाले होते ,त्याचे वर्णन करताना कवी राज म्हणाले सर्वांगाला शेंदूर फासलेल्या हनुमान प्रमाणे तुम्ही दिसत आहात राजे, तर 'संभा किस मिट्टी से बना हुआ है ऐसी  अवलाद मुझे क्यून मिली 'अशी खंत व्यक्त करण्याची वेळ औरंगजेबावर आली.  संभाजीराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या गडाची आणि परिसराची माहिती औरंगजेबाच्या अत्याचारात हुतात्मा  झालेल्या संभाजी महाराजांचा करारीबाणा  स्फूर्तीदायक ठरला. 

        अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हे तालुक्याचे ठिकाण श्रीगोंदा- सिद्धटेक मार्गावर पेडगाव हे ऐतिहासिक गाव हे भीमा आणि सरस्वती नदी किनारी असलेले टुमदार गाव असून श्रीगोंदा ते पेडगाव अकरा किलोमीटर अंतर आहे आणि सिद्धटेक ते पेडगाव १५ किलोमीटर अंतरावर आहे. 

पेडगाव हे ५२ पेठा असलेले गाव म्हणून ओळखलं जायचं या गावानजीक धर्मवीरगड याचं नाव बहादूर गड असे होते.  परंतु२००८साली या गडाचे  नामकरण धर्मवीरगड असे करण्यात आले. 

 गडा विषयी थोडक्यात परामर्ष घेण्याचा हा प्रयत्न गडाला १२ वेशी  आहेत.  येथील तुळजाभवानी मंदिर आणि मंदिरातील मूर्ती सुंदर असून मंदिराचे कोरीव काम देखने आहे या मंदिराचा कळस गोल घुमट आकार असा आगळावेगळा आहे आणि मूर्ती भैरवनाथ आहे मंदिर असून मूर्ती सुबक असून त्या ठिकाणी हनुमानाची दगडी मूर्तीही आहे येथील दगडातील सुंदर कलाकृती प्रेक्षणीय आहे तसं काही भाग तुटलेला असला तरी भंगलेल्या अवस्थेत आजही कायम आहे या ठिकाणी बारा शिवलिंग आहेत, पण येथे जंगल गवत आणि बाभळी ली प्रचंड प्रमाणात वाढले असल्याने हे शिवलिंग झाकले गेले आहे हत्तीच्या मोटेने  नदीचे पाणी एका टाकीत भरून ते सर्व गावाला पुरवत असत, ते ठिकाणही येथून जवळच आहे नदीकाठी बांधकामासाठी चुना वाळू घाणा आहे.  

याठिकाणी सिंधुदुर्ग संवर्धन, पुणे ,यांनी जागोजागी माहितीचे फलक लावले आहेत.  हा गड पर्यटकांसाठी विकसित करणे गरजेचे आहे याठिकाणी निवासव्यवस्था नाही.  पिण्याच्या पाण्याची सोय नाही.  रस्त्याच्या कडेला सावली देणारे झाडे लावली पाहिजेत, गडाची पडझड  झाली असून त्याची दुरुस्ती करणे आणि निगा राखण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न होणे गरजेचे आहे अनावश्यक गवत आणि बाबळीचे जंगल कमी केले पाहिजे . हे ऐतिहासिक असे स्थान तसे दुर्लक्षित आहे.  दुर्गप्रेमी पर्यटक आणि शिवभक्तांनी  आवर्जून भेट द्यावी असा हा धर्मवीरगड आहे. 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        प्रकाश खिस्ती                                                                                                                                      बेलवंडी बुद्रुक, तालुका श्रीगोंदा,                                                                                                                               जिल्हा-  अहमदनगर


Post a Comment

0 Comments