दीपावली वार्षिक राशीभविष्य

दीपावली वार्षिक राशीभविष्य 

तूळ : स्पर्धात्मक यश 


हे वर्ष आपल्याला मानसिक त्रासाचे जाणवेल त्यामुळे आरोग्य सांभाळावे. वृद्धांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज राहील. नोकरीत व्यापारात मंडी जाणवेल , नौकरदारांना नौकरी सांभाळून राहावे लागेल.मुला-मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या अभ्यासाकडे प्रगती कडे नेण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोव्हेंबर २२० ते जानेवारी २०२१ दरम्यान कोर्ट कचेरी मुळे त्रास होऊ शकतो.शेतजमीन,फ्लॅट,बांगला,गाडी खरेदी मध्ये थोड्या अडचणी उद्भवतील तेव्हा खरेदीचे व्यवहार जपून करावेत. नास्तिक प्रवृत्ती वाढवणारा व हितशत्रूंच्या कारवाया वाढवणारा कालावधी असल्याने.एकूण वर्षभरात मन प्रसन्न राहून मित्र मंडळीत मान सन्मान देणारा काळ आहे. सहली, पार्टी, लग्न समारंभात एकत्र भेटी गाठींमुळे मनोमन आनंद मिळवता  येणार आहे. घरातील लग्नकार्यामध्ये सहकार्य करता येईल वाहन सुख मिळेल, प्रवास मनाप्रमाणे करता येईल. नौकरी व्यवसायात काही अडचणी कायम राहतील पण त्यातून मार्ग काढता येईल. 

उपासना : यावर्षी कुलधर्म , कुलाचार पळून तिरुपती बालाजीची उपासना करावी , लक्ष्मी कुबेर देवाची उपासना करावी.   

वृश्चिक : आत्मविश्वास मिळेल 

हे वर्ष थोड्या अडचणीचे त्रासाचे जाणार आहे. काही महिने त्रास होऊ शकतो आनंदाच्या प्रसंगात शुभ कार्याच्या योगाने खरेदी आणि प्रवासातून आनंद मिळवता येईल. शेतीवाडी , फ्लॅट,बंगला,गाडी, फार्महाउस , इत्यादी खरेदी शक्यतो २०२१ च्या ऑगस्ट मध्ये करावी तो पर्यंत कोर्ट कचेरीच्या कामातून वैताग राहील मात्र त्यातून मार्ग निघेल. विद्यार्त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षणात प्रगती करता येईल.त्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळवता येईल. काही महिने पैश्याची अडचण राहील. योग्य गुंतवणुकीकरण्याची गरज आहे.पूर्वी गुंतवणूक केलेल्या पैश्यात तोटा होऊन चणचण भासणार आहे. नौकरीत बदल अथवा बदली होईल. भाऊबंदकीचा त्रास राहील.

उपासना : गणपती , मारुतीची उपासना करावी गणेश याग आणि घरीही उदक शांती करावी काही क्लेशदायक असतील तर तीर्थ यात्रा आणि घरी पूजा ,  अभिषेक करून मनस्वास्थ्य मिळवावे. 

जोतिष - चिंतामणी देशपांडे 



Post a Comment

0 Comments