दिवाळी शॉपिंग महोत्सव

 दिवाळी शॉपिंग महोत्सव 

नव्या ट्रेंडचे गिफ्ट चॉकलेट 


अलीकडच्या काळात घरगुती फराळ करण्यासाठी वेळच मिळत नाही अशी ओरड अनेक महिलांकडून होते. मग नातेवाईक , ऑफिस मधल्या लोकांना आपल्या खास मित्र मैत्रिणींना चॉकलेटचे गिफ्ट पॅकेट देण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे.  

यंदा तर दिवली निमित्त फटाक्याच्या आकारातील चॉकलेट्स चे गिफ्ट बॉक्स अनेक महिलांकडे उपलब्ध आहेत. घरगुती तयार केलेल्या या चॉकलेट्स मध्ये फटाक्याच्या लडी, रॉकेट्स , भुईनळे ,आकाश कंदील , पणती , सुतळी बॉम्बच्या आकारातील चॉकलेट्स ने या गिफ्ट बॉक्स मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. वाजवी दरात, सुटसुटीत गिफ्ट दिल्याचे समाधान मिळवून देणाऱ्या या चॉकलेट्ससाठी आजच ऑर्डर नोंदवा अश्या अनेक जाहिराती/ पोस्ट्स फेसबुक आणि व्हाट्सअप वर फिरतांना दिसतात. 

यावर्षीच्या दिवाळी अगोदर बऱ्याच महिलांनी घरगुती चॉकलेट्सचे व्यवसाय सुरु केले असून त्याला फटाकड्यांच्या स्टिकर्स लावून फटाकड्यांचा लुक दिला जाऊन गिफ्ट देण्यासाठी चांगल्या गिफ्ट पॅक मध्ये, कॅव्हिटी बॉक्स मध्ये सजवून जास्तीत जास्त ग्राहकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.

अगदी तुटपुंज्या भांडवलात होम मेड  चॉकलेट्स चा व्यवसाय करता येतो. यासाठी यु-ट्युब वर बऱ्याच व्हिडीओज पाहायला मिळतात शिवाय चॉकलेट्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आता प्रत्येक गावात उपलब्ध असल्याने आणि चॉकलेट तयार करण्याच्या पद्धती सोप्या असल्याने महिला वर्ग या क्षेत्राकडे वळला नसत्या तरच नवल.

यंदा मिठाईच्या ऐवजी चॉकलेट्सचे बॉक्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून त्या बॉक्स मध्ये आकाश कंदील , लवंगी फटाकड्यांची लड, मोठ्या फटाकड्यांची लड, भुईनळे , भुईचक्र , अश्या फटाकड्यांच्या प्रतिकृतीनी भरलेला गिफ्ट बॉक्स हा नक्कीच गिफ्ट देणार्याला आणि गिफ्ट घेणाऱ्यालाही भावेल यात शंका नाही. चोकलेट्स च्या गिफ्ट बॉक्स बरोबरच चॉकलेट्सचे गुच्छ,पोटली, ओ.एच.पी. शीट्सच्या सहाय्याने तयार केलेले चौकोनी , षट्कोनी , गोलाकार कंटेनर्स मधूनही गिफ्ट देण्यासाठी म्हणून बाजारात उपलब्ध आहेत. हि गिफ्ट पॅक्स १०० रु - १००० रु पर्यंत च्या दरात उपलब्ध आहेत. यंदा महिला वर्गाचा हा प्रयोग यशस्वी ठरला तर पुढच्या वर्षांपासून हा एक नवा ट्रेंड निर्माण झालेला असेल.     



Post a Comment

0 Comments