सराफाला लुटल्या प्रकरणी आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश

सराफाला लुटल्या प्रकरणी आरोपींना 

मुद्देमालासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश 

वेब टीम नगर - कर्जत तालुका हद्दीत सोलापूर-नगर रस्त्यावर सरफास लुटणाऱ्या टोळीतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पञकारांशी माहिती दिली. 

आरोपींकडून १८,१६,६९० रुपये किंमतीचा मुद्दे माला हस्तगत केला आहे. अण्णा ऊर्फ अण्णासाहेब राम हरी गायकवाड ( वय २८ रा.विनोदेवस्ती वाकड पिंपरी चिंचवड पुणे), संदेश उर्फ बाळा महादेव डाडर (रा. लांगोरगल्ली, कर्जत), भारती उर्फ सागर नवनाथ साळवे (वय २४ रा. राशिन, ता. कर्जत), गणेश चंद्रकांत माळवे (रा. रायकरमळा, येवत जि. पुणे), अक्षय उर्फ बंटी बाबुराव धनवे (रा. प्रेमदान हडको अहमदनगर), राम जिजाबा साळवे (रा.राशीन जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडे 

११३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत ५ लाख ७६ हजार रुपयांचा, तर १७. १३ किलो वजनाची चांदी किंमत अंदाजे ८ लाख ५ हजार ६९० रुपये दागिने जप्त करून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती सुझुकी कंपनीची सेलोरीटो चारचाकी वाहन किंमत अंदाजे ३ लाख रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल किंमत ५० हजार रुपये, हिरो होंडा कंपनी स्प्लेंडर ४० हजार रुपये असे एकूण १८ लाख १६ हजार ६९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, असे श्री पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सपोनि सुरेश माने, पोसई अमरजित मोरे, सपोनि शिशीकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ दत्ता बांगडे, सुनील चव्हाण, दत्ता गव्हाणे, पोहेकाॅ कुरुंद, बाळासाहेब मुळीक, मनोज गोसावी,पोना संदीप पवार, सचिन आडबल, विशाल दळवी, दीपक शिंदे, प्रकाश वाघ, विनोद मासाळकर,कमलेश पाथरूट, राठोड, चापोहेकाँ बबन बेरड, चापोना संभाजी कोतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील खैरे कदम काळे वराडे काकडे सुपेकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



Post a Comment

0 Comments