आरोग्य आधार

आरोग्य आधार 

गव्हाच्या चिकाचे लाडू 


साहित्य : गहू , खोबरे किस १ वाटी , डिंक १/२ वाटी , बदाम व अक्रोड एकत्र १/२ वाटी, १ वाटी पिठी साखर , १/२ चमचा वेलची पूड, १/२ वाटी खारीक पावडर, १/२ वाटी साजूक तूप. 

कृती : प्रथम गहू ३ दिवस पाण्यात भिजत घालणे . तिन्ही दिवस रोज पाणी बदलणे. चौथ्या दिवशी गहू पायातून उपसून काढणे. मिक्सर वर थोडेसे पाणी टाकून चीक काढणे, हा चीक बारीक चाळणीने गाळून घेणे. एका कॉटन च्या कपड्यात बांधून ठेवणे. पाणी निघून गेले की चीक पावडर तयार होते, हि पावडर सावलीत फॅन खाली वाळवणे. 

पॅन मधे १/२ वाटी तूप घेणे ते विरघळले कि त्यात १ वाटी चीक पावडर टाकून गुलाबीसर भाजणे. भाजून झाल्यावर गॅस बंद करून त्यामध्ये खोबरे पावडर, खारीक , डिंक , बदाम अक्रोड, पिठीसाखर , वेलची पावडर टाकून सर्व एकत्रित करणे व लाडू करणे. गरज वाटल्यास थोडे साजूक तूप टाकणे. 

गव्हाचा चीक तसेच बदाम अक्रोड या मुले लाडू अधिकच पौष्टिक होतात. 


Post a Comment

0 Comments