बेरोजगारी , विषमता, सामाजिक प्रश्नांवर रचनात्मक आणि संघर्षात्मक कामांची गरज
वेब टीम नगर :करोना संसर्गाशी लढाई संपल्यावर निर्माण झालेली प्रचंड बेरोजगारी , विषमता आणि विविध सामाजिक प्रश्नांवर पुढील एक दशक अहोरात्र काम करावे लागेल.देशाच्या पुनर्बांधणीत मध्यवर्ती भूमिका बजावण्यासाठी स्नेहालय परीवार तरुणाईला आणि स्वयंसेवी संस्थांना प्रेरीत आणि प्रशिक्षित करीत राहील, असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेचे मुख्य समन्वयक अनिल गावडे यांनी केले.
गावडे यांचा ३८ वा जन्मदिन आज " कार्यकर्ता दिन ",म्हणून स्नेहालय परिवाराने साजरा केला. स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे या निमित्ताने स्नेहालय परिवाराने संकल्प मेळावा घेतला. यावेळी करोना संसर्गामुळे वंचित समाज घटक आणि सामाजिक संस्थासमोरील प्रश्नावर संवादसत्र घेण्यात आले.गावडे म्हणाले ,की स्नेहालयच्या माध्यमातून सेवाकार्य केल्याने आपले जीवन आशयसंपन्न झाले. याबद्दल स्नेहालय परिवाराची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
सर्वश्री भारत सेवक निक कॉक्स,श्रीमती जॉईस कोनोलीे, राजीव गुजर, हनीफ शेख , संजय गुगळे,प्रवीण मूत्याल, संजय बंदिष्टी ,मिलिंद एकनाथ कुलकर्णी,रत्ना शिंदे, यांनी कार्यकर्ता म्हणून आपल्या जडणघडणीतील अनुभव यावेळी व्यक्त केले. वैजनाथ लोहार यांनी आभार मानले.
0 Comments