आरोग्य आहार

आरोग्य आहार 

कोंड्याचे बुलेट्स 

साहित्य : एक वाटी गव्हाचा कोंडा , अर्धी वाटी मोड आलेले मूग , पाव वाटी हरभराडाळ , ४ मोठे चमचे उडीदडाळ , आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट , चिंच गूळ खजुराची चटणी , बारीक शेव तीळ , कोथिंबीर, मीठ , हळद तिखट. 

कृती: प्रथम हरभराडाळ , उडीदडाळ वेगवेगळी ४-५ तासांसाठी भिजवून ठेवणे मोड आलेले मूग , भिजवलेले हरभराडाळ आणि उडीद डाळ मिक्सरमधून जाडसर व शक्यतो पाणी न टाकता बारीक करून घ्यावेत , गरज वाटल्यास थोडे पाणी टाकावे. नंतर तिन्ही पीठे एकत्रित करून त्यात कोंडा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट , मीठ , हळद, तिखट घालून चांगले मळून घ्यावे, नंतर तयार पिठाचे तेलाचा हात लावून बुलेट्स करून घ्यावेत. मोदक पात्रात चांगले वाफवून घ्यावेत . 

वाफवलेले बुलेट्स बाउल मध्ये काढून त्यावर चिंच गूळ  खजूर चटणी ,बारीक शेव , बारीक चिरलेली कोथिंबीर व कच्चे तीळ भुरभुरून सर्व्ह करावेत. 

कोंड्यामुळे भरपूर फायबर मिळते सर्व डाळींमधून प्रोटीन मिळते.तसेच खजुराची चटणी व शेव यामुळे चाट चा फील येऊन मुले आवडीने खातात.

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

*Diploma in Nutrition and Health Education 

*Diploma in Yog Shikshak



Post a Comment

0 Comments