प्रत्येक आपत्तीत रोटरी क्लबचे मोठे मदत कार्य

प्रत्येक आपत्तीत रोटरी क्लबचे मोठे मदत कार्य  

डॉ. सुनील पोखरणा :जिल्हा रुग्णालयास 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची भेट  

वेब टीम नगर – करोना अद्याप संपलेला नाहीये. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तळागाळातील रुग्णांना रोटरी क्लबने दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपोयोगी आहेत. गरजू रुग्णांवर अत्याधुनिक मशिनरीद्वारे चांगले उपचार करता येतील. मी सुद्धा रोटरीचा सदस्य होतो. त्यामुळे रोटरीच्या सेवाभावी कार्याची मला चांगली माहिती आहे.गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक संकट व आपत्तीत रोटरी क्लब मोठे मदत कार्य करत आहे.असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी केले.

          नगर मधील रोटरी क्लब मिडटाऊन, रोटरी क्लब सेंट्रल, रोटरी क्लब मेन, रोटरी क्लब प्रियदर्शनी, रोटरी क्लब इंटिग्रिटी या पाच रोटरी क्लबच्या प्रयत्नातून जिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन चा पुरवठा करणाऱ्या ५ अत्याधुनीक व अत्यावश्यक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कडे या मशिनरी सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी माजी प्रांतपाल प्रमोद परीक, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे, रोटरी क्लब मेनचे अध्यक्ष ॲड.अमित बोरकर, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्ना खाजगीवाले, रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या अध्यक्षा गिता गिल्डा, सचिव ईश्वर अशोक बोरा, सचिव पुरुषोत्तम जाधव, रोटरी क्लब इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफीक मुन्शी, आरोग्याधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ. महावीर कटारिया, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. अजित गरुड आदि उपस्थित होते.

          प्रमोद पारीक म्हणाले, संपूर्ण जगात रोटरी क्लबच्या माध्यमातून खूप मोठे मदत कार्य या करोना संकटात केले आहे. रोटरी इंटरनॅशनल फौंडेशन कडून नगर जिल्ह्यासाठी सुमारे ५८ लाखाची तातडीची ग्र्यांड मिळाली आहे. यातून जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलला १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयास यापुढील काळातही रोटरी या पेक्षाही अधिक मदत करणार आहे.

प्रास्ताविकात क्षितिज झावरे म्हणाले, नगरमधील सर्व ५ रोटरी क्लब एकत्र येत रोटरी कोविड सेंटर सुरु केले होते. त्यामाध्यातून सुमारे १६०० रुग्णांनी मोफत उपचार घेवून कोरनावर मात केली आहे. एवढ्यावरच न थांबता आता रोटरी क्लबचे प्रांतपाल हरिष मोटवाणी यांच्या सहकार्याने रोटरी इंटरनॅशनल फौंडेशन कडून मंजूर झालेल्या निधीतून नगरच्या जिल्हा रुग्णालयास अद्यावत व अत्यावश्यक असलेले ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देत आहोत. येत्या काळात करोनाची पुन्हा लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन कमी झालेल्या सर्वसामान्य रुग्णांना हे मशीन फार उपोयोगी पडणार आहेत.

यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी सुत्रसंचलन केले. प्रसन्ना खाजगीवाले यांनी आभार मानले.

 कोरोनाच्या प्रत्येक पायरीवर रोटरी क्लबची भरीव मदत 

कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्यापासून प्रत्येक पायरीवर रोटरी क्लबने मोठी मदत करून पीडितांचें दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला यासाठी कोविड सेंटरचीही निर्मिती केली होती.अजूनही शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी  आधुनिक उपकरणे दिली असून भविष्यकाळातही मदत केली जाईल अशी प्रतिक्रिया रोटरीचे सचिव ईश्वर बोरा यांनी "नगर टुडे"शी बोलतांना दिली.  

Post a Comment

0 Comments