शक्तिधाम,शाकंबरी माता मंदिरात
कोजागिरी पौर्णिमा साजरी
सकारात्मक जीवनाचा मार्ग गुरूमुळे प्राप्त होतो-विठ्ठल भांड
वेब टीम नगर- मानवाच्या जीवनात गुरुला विशेष स्थान आहे.गुरु शिष्याला उपदेश करतो त्यामुळे त्याचे जीवन सत्याला सामोरे जाणारे ठरते.गुरूमुळे परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते.आत्मा हाच परमेश्वर आहे याची प्रचिती येते.सकारात्मक जीवनाचा मार्ग आणि मनःशांती प्राप्त होते.म्हणून प्रत्येकाच्या जीवनात गुरु असावा.असे विठ्ठल भांड यांनी सांगितले.
सावेडी,रासने नगर येथील श्री शक्तिधाम,शाकंबरी माता मंदिरात सुरु असलेले सहस्रचंडी यज्ञाच्या प्रथम आवरण स्वहनाम प्रसंगी भक्तांना विठ्ठल भांड मार्गदर्शन करीत होते.महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली.याप्रसंगी विश्वहिंदू परिषदेचे मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,विहिपचे प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,रवींद्र सिद्धेश्वर,यशवन्त गारडे,चकाले मामा,वाकळे काका,गोरख पडोळे,राधाकृष्ण भजनी मंडळाच्या सौ.हेमलता पडोळे,सौ.योगिता कोरडे,सौ.संगीता चिंतामणी,सौ.विजया भांबरकर आदी उपस्थित होते.
सहस्रचंडी यज्ञाच्या प्रथम आवरण स्वहनाम धन्य यामध्ये सहा आयोजक,अकरा यजमान व एकशे आठ श्री.चंडी पाठ झाले.स्वामीजींच्या कृपाप्रसाद रूपाने सम्पूर्ण कलशाचे श्रीफळ,पूर्ण पात्र,मंगलद्रव्य या स्वरूपात लकी ड्रा.पद्धतीने भाविकांची नावे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते काढण्यात आली. सहस्रचंडी यज्ञाचा आयोजक प्रमोद गोंदकर, यजमान नितीन घोडके,चंडी पाठ महेश सिद्धेश्वर यांना हा सन्मान प्राप्त झाला.स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व भाविक एकत्र होऊन दशोंस पाठ करण्यास प्रतिबध्द आहोत.असे भांड यांनी सांगितले.
कोजागिरीचा हा कार्यक्रम आद्य गुरु शंकराचार्यांचे शिष्य श्री.गदाधर महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार सम्पन्न झाला. चन्द्राच्या प्रकाशात दूध पिऊन रात्र जागणे आणि देवीचे भजने गाणे व नामस्मरण करणे असे कोजागिरी पौर्णिमेचे महत्व रवींद्र सिद्धेश्वर यांनी सांगितले.सुहासिनी महिलांनी देवीची ओटी भरली.शेवटी सर्वाना दुधाचा प्रसाद देण्यात आला.
0 Comments