"देह वेचावा कारणी " या स्व.बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहोळा १३ रोजी

 "देह वेचावा कारणी " या स्व.बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहोळा १३ रोजी 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन 


वेब टीम नगर - माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे लिखित आत्मचरित्र देह वेचावा कारणी चा प्रकाशन सोहळा १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली तुन हा प्रकाशन सोहळा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जेष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी आणि जेष्ठ नेते वसंतराव कापरे  उपस्थित होते. =

देह वेचावा कारणी हे आत्मचरित्र ७०० पानांचे असून राजहंस प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. याच वेळी माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या संदर्भातील ७० लोकांच्या मुलाखतीचे जेष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी लिखित मुलखा वेगळा माणूस हे पद्मगंधा प्रकाशनच्या वतीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे हि प्रकाशन या वेळीही होणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

देह वेचावा कारणी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरही लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून जेष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर केले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देह वाचावा कारणी च्या ऑनलाईन प्रकाशन सोहोळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य करतानाच बाळासाहेब विखे यांच्या साठी मी हे निमंत्रण स्वीकारत असून ते एक स्पष्ट वक्ते, समाज करणी होते. त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असे कधीच नव्हते. माझे आणि त्यांचे अत्यंत घनिष्ट संबंध होते मात्र ह्याचा उल्लेख ते कधी करत नसत असे सांगितले. 

हा व्हर्च्युअल प्रकाशन सोहोळा  सर्वांना पाहता यावा यासाठी प्रत्येक तालुक्यात एक संच लावण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्ते  परिश्रम घेत असल्याचं 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगून पंतप्रधानांच्या भाषणात पंतप्रधान स्व.बाळासाहेब विखे यांच्या बरोबरच नवीन कृषी विषयक धोरणावरही बोलतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच बाळासाहेब विखे शिवसेनेचे खासदार असतांना त्यांनी केंद्रात अर्थराज्यमंत्री पदाची कारकीर्द गाजवली त्यामुळे शिवसेना प्रमुख यांच्या बरोबर त्यांचा व्यक्तिगत स्नेह होताच त्या स्नेहा पोटी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली असल्याची राधा कृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.   

Post a Comment

0 Comments