त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

विजय बनछोड : तीन कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ भा.यु.मो च्या वतीने  पाकिस्तान सरकारच्या पुतळ्याचे दहन

     वेब टीम नगर -जम्मू-काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. त्याचा नगरमध्ये भाजप युवा मोर्चाच्यावतीने गांधी मैदान येथील भाजप कार्यालयसमोर पाकिस्तान सरकारचा पुतळा दहन करुन निषेध करण्यात आला. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय बनछोड, जिल्हाध्यक्ष महेश तवले, उमेश साठे, अमोल निस्ताने, दिपक तगारे, राजेंद्र सातपुते, अभिजित चिप्पा, राकेश भाकरे, किरण जाधव, आदेश गायकवाड, अभिजित सोनवणे, अभिषेक शिंदे, ओंकार पत्की, पियुष संचेती, आनंदराज निंबाळकर, निखिल दगडे, सुजित खरमाळे, आकाश सोनवणे, योगेश मुथा, वैष्णवी मगर, गुणाली मुथा आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी  विजय बनछोड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कठोर धोरणामुळे जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करुन पळता भुई थोडी केली आहे. लष्कारातील जवानांनी आपल्या कामगिरीने दशतवाद्यांचे अड्डे बेचिराख केले आहे. त्यामुळे दहशतवाद्याचे पूर्ण नेटवर्क मोडकळीस आले आहे. त्यामुळेच दहशहवादी आता निष्पाप व नि:शस्त्र लोकांवर हल्ले करत आहे.  परंतु या हल्ल्याला भीक न घालता भारतीय जवान त्यांना मुहतोड जबाब देतील. या हल्ल्यात भाजपा युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते मारले गेले आहेत, त्याच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता याचा बदला जरुर घेतला जाईल. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत.

     याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश तवले म्हणाले, दहशतवाद्याचे सर्वसामान्यांवर हल्ला करण्याचे कृत्य भ्याडपणाचे लक्षण आहे. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सक्षमपणे प्रयत्न करत आहे. हल्यात मृत झालेले भाजप युवा मोर्चाचे कार्यकत्यांच्या कुटूंबियांच्या पाठिशी युवा मोर्चा खंबरपणे उभे आहेत.

     याप्रसंगी हल्ल्यातील मृत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Post a Comment

0 Comments