कोजागिरीनिमित्त रांगोळीतून साकारली देवीची विविध रुपे

कोरोनाचा नायनाट होऊन 

तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे

कोजागिरीनिमित्त रांगोळीतून साकारली देवीची विविध रुपे

   वेब टीम नगर - डिसेंबर २०१९ पासून जगावर कोरोनावर घातलेले संकट आता डिसेंबर २०२० पर्यंततरी या कोरोनाचा नायनाट होऊ दे, तुझी कृपा आमच्यावर सदैव राहूदे अशी आर्त हाक कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरीच महालक्ष्मी, मोहटा देवी आदिंची रुपे रांगोळीतून साकारुन दिली. 

     नगरमधील सावेडी, पाईपलाईन रोडवरील नूतन जवाहर भुजबळ या महिलेने कोरोना संकटात सर्व सण उत्सव साजरे झाले नसल्याने आषाढी एकादशीला देखील विठ्ठल-रुख्मिणीची रांगोळीतून मूर्ती साकारली होती. आता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपल्या घरातच देवीची विविध रुपे साकारुन या 2020 सालातच कोरोनाचा नायनाट करण्याची देवीला प्रार्थना केली आहे.  त्यांच्या या रांगोळीतून साकारलेल्या देवीच्या प्रसन्न मूर्ती परिसरातील नागरिकांनी पाहताच समाधान व्यक्त केले.

     नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नूतन या स्नुषा आहेत. नूतन यांनी आपल्या पह्ल्यिा कन्येचे देखील कॉलनीत वाजत गाजत स्त्री जन्माचे स्वागत करुन आदर व्यक्त केला होता.

Post a Comment

0 Comments