आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

नाचणी इडली 

साहित्य : ३ वाटी तांदूळ , १ वाटी उडीद डाळ , १ छोटा चमचा मेथी दाणे , मीठ , एक वाटी नाचणी सत्व. 

कृती:  ३ वाटी तांदूळ , मेथी दाणे आणि उडीद डाळ ५ - ६ तासांसाठी भिजवून ठेवणे. मिक्सर मध्ये वेगवेगळे रवाळ वाटून घेणे. नंतर दोन्ही पीठ एकत्रित करून मीठ टाकून ५-६ तास ठेवणे. 

३ वाटी पिठामध्ये १ वाटी नाचणी सत्व घालून एकजीव करणे. गरज वाटल्यास थोडे मीठ टाकणे. इडली पात्राला तेल लावून इडली चांगल्या वाफवून घेणे ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावी.नुसत्या नाचणीची सुद्धा इडली करू शकतो पण उडीद डाळ मिक्स करून आपण या पदार्थातील प्रोटीन वाढवतो. याच पिठामध्ये गाजर, दुधी भोपळा व हिरवी मिरची पेस्ट घालून मसाला इडली सुद्धा करता येते. 

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak



Post a Comment

0 Comments