आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

स्प्राऊट भेळ 

साहित्य -मूग दिड वाटी ,पाऊण वाटी मटकी ,अर्धा वाटी चवळी ,पाव वाटी हिरवे हरभरे,तीन मोठे चमचे सोयाबीन ,कांदा ,टोम्याटो ,कोबी ,कोथिंबीर, डाळिंब, हिरवी मिरची पेस्ट ,लाल तिखट ,हळद ,चाट मसाला मीठ ,लिंबू ,साखर. 

तयारी- प्रथम सर्व कडधान्यांना मोड आणून घ्यावेत. फक्त सोयाबीनला मोड आणतांना कपड्यामध्ये बांधून ठेवू नये.भिजवलेले सोयाबीन चाळणीत ठेवून त्यावर ओले कापड झाकून ठेवावे .टोम्याटो ,कांदा, कोथिंबीर  बारीक चिरून घ्यावे. कोबी लांबट चिरावे.मिरचीची पेस्ट करून घ्यावी . डाळिंब सोलून दाणे काढून घ्यावेत. 

कृती -प्रथम सर्व मोड आलेली कडधान्ये पाणी न घालता हळद घालून शिजवून घ्यावेत. कुकरमधून एका शिट्टी काढून वाफवून घेणे .सर्व कडधान्ये एकत्रित करून घेणे,त्यामध्ये मिरचीची पेस्ट कांदा ,टोम्याटो,चाट मसाला ,मीठ ,साखर ,लिंबू घालून चांगले एकत्रित करून घ्यावे. कोबी व डाळिंब घालून सर्व्ह करावे.  

टीप -कुकरमध्ये वाफवून घेतल्याने पचायला हलकी होते. सर्व कडधान्यांमुळे प्रोटीनयुक्त  होते.  

Post a Comment

0 Comments