मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यवसायिकाचे 2 तारखेला धरणे आंदोलन


मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स 

व्यवसायिकाचे 2 तारखेला  धरणे आंदोलन

जिल्हास्तरीय नियोजन बैठक संपन्न

  वेब टीम नगर-  ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशनच्यावतीने संपूर्ण भारतातील शाखांची बैठक ऑनलाईन पद्धतीने  झाली. या बैठकीत दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत या आंदोलनाच्या नियोजनासाठी नगर जिल्ह्यातील व्यवसायिकांची बैठक नुकतीच संपन्न झाला. या बैठकीस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, उपाध्यक्ष पोपट राऊत, रघुनाथ चौरे, बबनराव म्हस्के, सचिव सौरभ तरटे, बाळासाहेब लगे, कार्याध्यक्ष समीर शेख, शहराध्यक्ष पंडितराव खरपुडे, राजेंद्र बोरुडे, राजेंद्र उईके, केटरिंग असोसिएशनचे राजेंद्र उदागे, साऊंड असोसिएशनचे शिवदत्त पांढरे आदि उपस्थित होते.

     यावेळी चंद्रकांत मेहेत्रे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर लॉन्स, कार्यालयातील कार्यक्रमांवर उपस्थितीवर बंधने असल्याने त्यावर टेन्ट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, डि.जे., साऊंड, लाईट, डेकोरेटर, इव्हेंट, फोटोग्राफर, बगीवाले,  आर्केस्ट कलावंत, आचारी, भटजी आदि अवलंबून आहेत. पर्यायाने त्यांच्या कुटूंबीयांवर उपासमारीचे वेळ आली आहे. शासनाच्यावतीने बर्‍याच गोष्टीं सुरु केल्या आहेत. कार्यालय, लॉन्स सुरु केले परंतु ५० लोकांची मर्यादा असल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या व्यवसायिकांची मोठी अडचण होत आहे. ही मर्यादा ५०० पर्यंत वाढवावी किंवा कार्यालय, लॉन्स, हॉलच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत करण्यात यावी. अशी मागणी आहे.  याबाबत सरकारला वेळोवेळी आंदोलन, निवेदने दिली आहेत. परंतु यावर अजुनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. तेव्हा आता दि.२ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मंगल कार्यालय व लॉन्सवर अवलंबून असणार्‍या विविध व्यावसायीक सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

     यावेळी पंडित खरपुडे म्हणाले, कोरोनामुळे विविध सर्वाजनिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या लाखो लोकांचा रोजगार ठप्प झालेला आहे. टप्प्याटप्याने शासनाने सर्व गोष्टी सुरु केल्या आहेत. परंतु मंगल कार्यास फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची अट अजूनही कायम आहे. ती रद्द करुन ५०० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्यावी. त्यातून या व्यवसायातील विविध घटकांचा रोजगार पुर्ववत सुरु होईल. आधीच कोरोनामुळे अनेकांची परिस्थिती नाजूक झाली आहे, आणि त्यात कामधंदा नसल्याने मोठ्या संकटांना हे व्यवसायिक तोंड देत आहेत.  त्याचबरोबर विविध टॅक्स मात्र सुरु आहेत. सरकारला वस्तूस्थितीची जाणिव करुन देण्यासाठी दि.२ नोव्हेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. या आंदोलनात सर्व व्यवसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सौरभ तरटे यांनी आंदोलनाविषयी माहिती देऊन प्रत्येक व्यवसायिकांची जबाबदारी समजावून सांगितली. शेवटी पोपट राऊत यांनी आभार मानले. बैठकीस गणेश आंबेकर, हुसेन शेख, जाफर बेग, सुरेश बनकर, इसाहक सय्यद, मारुती झगडे, मोहन शिंगाडे, सुनिल गंगुले,जालिंदर बर्डे, सुभाष औटी, शरद गाडीलकर, प्रकाश दरेकर, मेहेबुब इमाम शेख, बाळासाहेब लगे, सोमनाथ अंत्रे, संदिप खरात, आशिष मोरे, बाबासाहेब जाधव, सोपान डाके, योगेश मुथा, महादेव ढवळे, बाळासाहेब खेडकर आदिंसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments