मानवसेवा प्रकल्पाचे कार्य महानच

 मानवसेवा प्रकल्पाचे कार्य महानच


रमेशचंद्र बाफना  :लायनेस क्लब आणि महावीर इटरनॅशनल वीरच्या वतीनेनिराधारांना ब्लँकेटची उब

वेब टीम नगर :  समाजातील निराधार, बेघर, दिव्यांग, मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधूंना मायेने आधार देऊन कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे काळजी घेणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास लायनेस क्लब ऑफ अहमदनगर आणि महावीर इटरनॅशनल वीरच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

 लायनेस क्लब व महावीर इटरनॅशनल वीरच्या पदाधिकारी व सदस्यांनी अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पाला भेट देऊन थंडीच्या पार्श्‍वभूमीवर हा सामाजिक उपक्रम राबविला. निराधार, बेघर, दिव्यांग, मनोरुग्णांना आधार देणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाचे कार्य महानच असल्याची भावना महावीर इंटरनॅशनल वीरचे रमेशचंद्र बाफना यांनी व्यक्त केली. 

लायनेसच्या अध्यक्षा तथा माजी महापौर सुरेखाताई कदम यांनी मानवसेवा प्रकल्पाला मदतीचे आश्‍वासन देत प्रकल्पात वृक्षारोपण केले. यावेळी लायनेसच्या शारदा पवार, सुनंदा तांबे, शर्मिला कदम, शारदा होशिंग, सविता शिंदे, दिपाली आढाव, महावीर इंटरनॅशनल वीरचे गौतमलाल बरमेचा, राजेंद्र बाथरा, मनोज शेटीया, सुवालाल लालवाणी आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यानी उपस्थितांचे आभार मानले. पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या वतीने प्रसाद माळी, राहूल साबळे, कैलास शिरसाठ, अशोक मदणे, सिराज शेख यांनी केले. 

Post a Comment

0 Comments