आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे साकडे

आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे साकडे

वेब टीम नगर- ए.एन.एम. यांना न्यायलयीन आदेशानुसार स्थायीत्वाची ऑर्डर मिळण्यात याव्यात या मागणीचे निवेदन आरोग्य कर्मचारी हक्क संघर्ष समितीच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रिफ यांना देण्यात आले. याप्रसंगी श्रीमती एस.डी.वैद्य, एस.ई डोकडे, व्ही.डी.धनवटे, ए.बी.मोरे, एस.ओ.बनसोडे आदिंसह आरोग्य सेविका उपस्थित होत्या.

     पालकमंत्री ना.मुश्रिम यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर येथील १९९७ पासून ते २००५ पर्यंतच्या आरोग्य सेविका ज्या आजपर्यंत सेवेत असून, त्यांना स्थायीत्वाच्या नियुक्तीचा आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना अद्याप १२ व २० वर्षांची कालबद्ध पदोन्नत्ती मिळालेली नाही. याबाबत न्यायालयाने संबंधितांची सेवा नियमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तरीही आम्हाला आजपर्यंत कायम केलेले नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ या आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्यात यावी.

      न्यायालयाचा निकाल असूनही नियमित सेवेचे आदेश असतांना एकप्रकारे न्यायालयाचा अवामानही होत आहे. त्यामुळे शासनाचे इतर कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नसल्याने आरोग्य सेविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

 त्याचबरोबर उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचे दि.११/०२/२०२० च्या आदेशाची प्रत तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांचे दि.४/३/२०२० व १/६/२०२० च्या आदेशाची प्रतही दिली आहे.

Post a Comment

0 Comments