पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्था

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्था 

अध्यक्षपदी शांताराम आवारी तर 

उपाध्यक्षपदी दीपक वाळके यांची बिनविरोध निवड

पतसंस्थेचा कारभार सभासद हिताचाच, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन गैरसमज पसरविण्याचा डाव - नारायण तमनर

वेब टीम नगर - पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी  शांताराम आवारी तर उपाध्यक्षपदी दीपक वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष नारायण तमनर व उपाध्यक्ष  प्रियंका मिसाळ यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांच्याकडे पदभार सुपुर्द केला. यावेळी संचालक शहाराम चेमटे, शिवाजीराव तोरणे, नवनाथ धोंगडे, अजय लखापती, नामदेव बोरुडे, राधाकिसन आभाळे, उमेश डावखर, चंद्रकांत पडोळे, अभिमन्यू घोलवड, ललित पवार, विजया शिंदे, संजय गायके, सिताराम गागरे, राजू परदेशी, दत्तात्रय गडाख उपस्थित होते.

संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर अध्यक्ष  व उपाध्यक्ष यांची नव्याने निवड करणे बंधनकारक आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नाही. निवडीच्या प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून डी.टी .महाजन हे अध्यासी अधिकारी म्हणून होते. अध्यक्ष  पदासाठी सत्ताधारी तमनर यांच्या गटाकडून शांताराम आवारी व उपाध्यक्ष  पदासाठी दीपक वाळके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवारी यांच्या अर्जासाठी नारायण तमनर हे सूचक तर अनुमोदक अजय लखापती होते. वाळके यांच्या अर्जासाठी सूचक प्रियंका मिसाळ व अनुमोदक उमेश डावखर होते. एकूण संचालकांची परिस्थिती पाहता विरोधी दत्तात्रय गडाख गटाच्या संचालकांनी कुठलाही अर्ज भरला नाही त्यामुळे निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

यावेळी बोलताना मावळते अध्यक्ष व गटाचे नेते नारायण तमनर म्हणाले की, अध्यक्ष  व उपाध्यक्ष  निवडीबाबत ठरल्याप्रमाणे व इतर संचालकांनाही या पदाची समान संधी मिळावी या उद्देशाने सदरची निवड करण्यात आली आहे. मात्र विरोधकांनी राजीनामा दिल्याचे राजकीय भांडवल करून सभासदांमध्ये गैरसमज पसरविण्याचा घाणेरडा प्रकार केलेला आहे. बाहेर गैरसमज पसरवणारे काही सभासद संगनमताने संस्थेची बदनामी करीत आहेत. संस्थेत कुठल्याही प्रकारचा गैरकारभार झालेला नाही. जे नियमबाह्य कामकाज झालेले आहे. त्याबाबत आंम्ही स्वतःहून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केलेली आहे. तत्कालीन अध्यक्ष बोबडे यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास खामकर यांना हाताशी धरुन आपल्या नातेवाईकाची संस्थेत कनिष्ठ लिपिकपदी नियमबाह्य पद्धतीने नेमणूक केली होती. सदर विषयाबाबत बारा संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये तत्कालीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोषी ठरविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी खामकर यांचे संचालक मंडळाने निलंबन करुन त्यांची चौकशी सुरु आहे. संस्थेची प्रतिमा मलीन करून हितास बाधा आणणार्‍यांची कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नसून, विरोधकांचे सर्व मुद्दे व आरोप त्यांनी फेटाळून लावले. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न चालू आहे. गैरसमज पसरवणार्‍या सभासदांना तमनर यांनी केवळ सामाजिक हेतूने कार्य करत असाल तर आगामी निवडणुकीत कुठल्याही प्रकारे उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर करण्याचे आव्हान दिले. गैरसमज पसरविणारे कृष्णा आंधळे प्रकरणावर बोलण्यास तयार नाही. जाणीवपुर्व टार्गेट करण्याच्या हेतूने राजीनाम्याचा विषय पुढे करुन सभासदांची दिशाभूल विरोधी सभासद करत असल्याचे त्यांनी सांगितले. नुतन अध्यक्ष आवारी यांनी सत्ताधारी संचालकांमध्ये कुठलाही मतभेद नाही. मावळते अध्यक्ष नारायण तमनर यांनी संस्थेमध्ये ठोस निर्णयाबरोबरच दिशादर्शक काम केले आहे. सभासद हितासाठी असेच काम सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुतन उपाध्यक्ष  वाळके यांनी ही निवड बिनविरोध झाल्याने उपस्थित संचालकांचे आभार मानले व सभासदांच्या हितासाठी बांधील असल्याचे स्पष्ट केले. माजी अध्यक्ष  व मार्गदर्शक त्रिंबक राऊत यांनी सर्व संचालकांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. 

Post a Comment

0 Comments