मुस्लिम समाजास राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय:हाजी इर्शादभाई

 मुस्लिम समाजास राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय:हाजी इर्शादभाईवेब टीम नगर : मुस्लिम समाज शैक्षणिक द्रुष्ट्या, आर्थिक द्रुष्ट्या, राजकीय व सामाजिक द्रुष्ट्या अतिशय मागासलेला असुन समाजास मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण ही काळाची गरज व हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष व मुख्य प्रवक्ते हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.

अहमदनगर येथे प्रदेश समितीची बैठक व मेळावा हाजी इर्शादभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी विशेषता समितीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुफियान शेख, प्रदेश महासचिव डॉ. परवेज अशरफी, मुंबई हायकोर्टचे कायदेतज्ञ ॲड. समीर शेख, ॲड. भाऊ साहेब गावडे आदि मान्यवर उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील काही महत्वपूर्ण नेत्यांनी मुस्लिम आरक्षणाचा निर्णय लवकरच होऊन तसा अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले असुन आपणास नुसते आश्वासन न देता मुस्लिम आरक्षण हे अल्पसंख्यक मुस्लिम समाजाचा संविधानिक अधिकार आहे. हा लढा स्वाभिमानाचा असुन सरकारने समाजाचा अंत पाहू नये व लवकरात लवकर अध्या

देश काढून मुस्लिम आरक्षण त्वरित सर्व क्षेत्रात लागू करावे अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.

मेळाव्यात कायदेतज्ञ ॲड. समीर शेख, डॉ. परवेज अशरफी, ॲड. सुफियान शेख, ॲड. भाऊ साहेब गावडे आदि मान्यवरांचे मार्गदर्शन होऊन अनेक पदाधिकार्यांना नियुक्ति पत्र देण्यात आली.मेळाव्याचे सुत्रसंचालन समितीचे जिल्हा अध्यक्ष हाजी जावेद शेख व आभार प्रदर्शन मुफ्ती अलताफ़ यांनी केले. यावेळी समिती समितीचे जिल्हा सचिव फिरोज शेख, शहराध्यक्ष अमीर खान, शाहनवाज तांबोळी, मूसैफ शेख , समदभाई जमादार, रियाज़ बागवान, जाकिर शेख ,वसिम खान आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments