पोस्ट खात्याने घेतली शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्याची दखल

 पोस्ट खात्याने घेतली शिवाजी महाराजांच्या 

 निष्ठावंत मावळ्याची दखल 

 अशोक औटी : वीर जिवाजी महाले चौकात जयंतीनिमित्त अभिवादन

   वेब टीम नगर : स्वत:च्या जीवावर उदार होत ज्याने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता. महाराजांवर चाल करुन गेलेल्या सय्यद बंडाला ज्याने यमसदनाला धाडले आणि इतिहासात ज्याचा पराक्रम ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या म्हणीने नोंदवला गेला त्या जीवा महालेंची दखल भारतीय टपाल खात्याने घेऊन ‘वीर जीवाजी महाले-शिवाजी महाराजांचे अंगरक्षक’ या नावाने पोस्टाचे विशेष पाकिट प्रकाशित केले, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळ्याची दखल घेण्याची ही घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली, असे प्रतिपादन राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक औटी यांनी केले.

     सावेडी येथील नगर-मनमाड रोडवरील वीर जिवाजी महाले चौकात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री. संत सेना सेवाभावी संस्थेच्यावतीने चौकातील फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी  औटी, बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोकूळ मगर, खजिनदार शहाजी कदम, माऊली गायकवाड, बाबुराव दळवी, स्वातीताई पवळे, संदिप घुले, रमेश भुजबळ, मगर अप्पा, आशिष ताकपिरे आदि उपस्थित होते.

     औटी पुढे म्हणाले, प्रतापगडावर महाराजांनी गाजवलेला पराक्रम तर सर्वश्रुत आहेच पण त्या रणसंग्रमाचा पराक्रम ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही, असा महाराजांचा अत्यंत विश्वासू, शूर अंगरक्षक म्हणजे, जिवाजी महाले पण तो इतिहासाच्या पुस्तकातच राहिला. आजही प्रतापगडावर कुठेही जिवा महालेंच्या पराक्रमाचा इतिहास सांंगणारी शिळा नाही कि स्मारक नाही. याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. या शूरवीर शिवरत्नाची ओळख व्हावी, म्हणून या चौकाचे नामकरण केले येथे त्यांचा पुतळा बसविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे  औटी यांनी यावेळी सांगितले.

     यावेळी गोकूळ मगर, शहाजी कदम आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.  कोरोनामुळे मृत पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Post a Comment

0 Comments