आरोग्य आहार

आरोग्य आहार 

गुळाची दशमी

 


साहित्य :

वाटी कणिक

/ हरभरा डाळीचे पीठ

वाटी किसलेला (सेंद्रिय गुळ)

बडीशेप पावडर

ओवा

मीठ

वेलची पावडर

कृती :

प्रथम दोन वाटी गुळामध्ये गूळ बुडेल इतके पाणी घालून गुल वीरगळवून घ्यावा.

कणिक, डाळीचे पीठ एकत्र करून घ्यावे . त्यामध्ये चमचे बडीशेप पावडर / चमचा वेलची पावडर, / चमचा ओवा , किंचित मीठ एक चमचा तेल टाकून मिक्स करावे .विरघळला गुळाच्या पाण्यात पीठ मळून घ्यावे. गुल विरघळवून घेताना पाणी खूप कमी घालावे म्हणजे दशमी गोड होते

पिठाचे माध्यम आकाराचे गोळे करून जरा जाडसर पोळ्या लाटून घ्याव्यात. तव्यावर साजूक तूप सोडून गुलाबी रंगावर दशमी खरपूस  भाजून घ्यावी.

शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करणे

पोषण मूल्य : 

यात वापरलेल्या भरपूर सेंद्रिय गुळामुळे आयर्न मिळते. त्याचप्रमाणे कणके मुळे काटर्बोहायड्रेट्स ,हरभरा डाळीमुळे प्रोटीन मिळते,  बडीशेप ओवा यामुळे पचनासही सोपे होते. साजूक तूप मुळे गुड फॅट्स मिळतात.   


अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 

Post a Comment

0 Comments