शिवसेनेत समेट

 शिवसेनेत समेट

कोरगावकर , प्रा. गाडे यांच्या पुढाकारातून बैठक 


वेब टीम  नगर -  शहर शिवसेनेत गेल्या काही दिवसापासून झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी उघड उघड गटबाजीचे प्रदर्शनही वेळोवेळी झाले . शिवसेनेतील या गटबाजीचा पार्श्ववभूमीवर आज पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर जिल्हा प्रमुख प्रा. शिशिकांत गाडे यांच्या पुढाकाराने झाली व त्या बैठकीत समेट घडवून आणत गटबाजीला पूर्णविराम दिला. 

  गेल्या काही दिवसापासुन शहर शिवसेनेत गटबाजीचे ग्रहण लागून धुसफूस सुरु होती. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. संपर्क प्रमुख , शहर प्रमुख तक्रारीही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रमुखांच्या लेटर हेड चा गैरवापर , जातीवादाचा राजकारण, शिवसेना स्टाईल प्रत्युत्तरे, आदी विषयांवर आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली , या बैठकीला शहर प्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, मा.महापौर भगवान फुलसौंदर , अंबादास पंधाडे , संजय शेंडगे , संभाजी कदम , गणेश कवडे , अनिल बोरुडे, अनिल शिंदे , दत्ता गावरे, दत्ता जाधव, विजय पठारे,  मदन आढाव , संग्राम शेळके, रवी वाकळे , अशोक दहिफळे, बाळासाहेब बोराटे , सुभाष लोंढे , योगीराज गाडे , शाम नळकांडे , गिरीश जाधव , रमेश परतानी , अरुण गोयल , अशा निंबाळकर, स्मिता अष्टेकर, आदी उपस्थित होते. 


व्यक्ती निष्ठे पेक्षा संघटना निष्ठा जाणली पाहिजे , व्यक्ती पूजा करण्यापेक्षा भगव्याची तेज राखण्यासाठी भेदभाव विसरून मनातील जळमटे काढून टाकावीत असे आवाहन भाऊ  कोरगावकर यांनी केले. कोणीही स्वहितासाठी संघटनेला बदनाम करू नये . स्व. अनिल राठोड यांनी जोमाने उभारलेली शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या कडून नगरच्या विकासासाठी आदिकादिक फायदा कसा करून घेता येईल या साठी प्रयत्न करावेत असे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे म्हणाले. येत्या १८ रोजी नक्षत्र लॉन्स येथे सभासद नोंदणीची बैठक होणार असून संघटनेसाठी काम करत असताना अडीअडचणी आल्यास मंत्री शंकरराव गडाख , संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर व जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांना अडचणी सांगाव्यात असेजही आवाहन करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments