आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

सोया चंक राईस 


साहित्य : 

छोटे सोयाबिन चंक्स ,तांदूळ , लवंग, तमालपत्र , मीठ , गाजर , मटार , फ्लॉवर , कोथींबीर , धने-जिरे पावडर. 


कृती : 

प्रथम सोयाबिन चंक्स पाण्यातून उकडून घ्यावेत. नंतर बासमती तांदूळ थोडे लिंबू पिळून फडफडीत शिजवून घ्यावा. 

गाईच्या तुपाची फोडणी करून प्रथम त्यामध्ये लवंग ,तमालपत्र घालावे , त्यामध्ये लांब चिरलेला गाजर , मटार, बारीक चिरलेला फ्लॉवर घालून झाकण ठेऊन वाफवून घ्यावे दोन वाफ आल्यानंतर उकडलेले सोया चंक्स घालून एक वाफ आणावी. 

त्यानंतर  शिजवलेला बासमती भात, मीठ धने-जिरे पावडर , चवीपुरती (चिमूटभर) साखर घालून एक वाफ आणावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. 

पोषण मूल्ये :

 सोयाबीन चंक्समुळे  प्रोटीनयुक्त डिश तयार होते. त्याचप्रमाणे तांदळामधून कार्बोहायड्रेट्स तर गाजर,मटार,फ्लॉवर यामुळे फायबर तसेच साजूक तुपातून गुड फॅट्स मिळतात. त्यामूळे प्रोटीन , फायबर , कार्बोहायड्रेट्स आणि गुड फॅट्स युक्त असा पदार्थ तयार होतो. 


अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 

Post a Comment

0 Comments