अ.भा. वारकरी मंडळाच्या नगर तालुका मुख्य सचिवपदी बालयोगी अमोल महाराज जाधव

 

अ.भा. वारकरी मंडळाच्या नगर तालुका मुख्य सचिवपदी बालयोगी अमोल महाराज जाधव

वेब टीम नगर : वाकोडी (ता. नगर) येथील बालयोगी अमोल महाराज जाधव यांची अ.भा. वारकरी मंडळाच्या नगर तालुका मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज डोंगरे व प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके यांनी बालयोगी अमोल महाराज जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्ती पत्र दिले.

अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी वारकरी संप्रदायाच्या विचार धारेने कार्य करण्यासाठी बालयोगी अमोल महाराज यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बालयोगी अमोल महाराज हे राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे व महंत रामगिरी महाराज यांचे शिष्य असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाच्या विचारधारेने कार्य करीत आहे. या निवडीबद्दल त्यांचे ह.भ.प. तुळशीराम लबडे महाराज, ह.भ.प. अमोल महाराज सातपुते, ह.भ.प. स्वप्निल महाराज पवार, ह.भ.प. हिराताई मोकाटे, ह.भ.प. सुदाम महाराज दारकुंडे, वाकोडी भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ, संत भगवान बाबा ट्रस्ट, सारसनगर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments